विमानतळावर रोबोट करतोय प्रवाशांची मदत

विमानतळ, रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मदतीची गरज लागते. म्हणून आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित रोबोट तयार करण्यात आला आहे. विमानतळ प्राधिकरणाने हा रोबोट सादर केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर कोईम्बतूर विमानतळावर सध्या असा रोबोट दिसत आहे.

कोईम्बतूर विमानतळाच्या ट्विटर हँडलवरून आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित रोबोटची माहिती देण्यात आली आहे. तो  लहान मुलांना  कसा मदत करतो, हे ट्विटरवर शेअर केलेल्या पह्टोतून दाखवले आहे. बंगळुरूच्या पैम्पगौड आंतरराष्ट्रीय विमानतळानेही प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी असे 10 रोबोट तैनात केले आहेत.