काबूल विमानतळावर रॉकेट हल्ला

सामना ऑनलाईन। काबूल
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. जवळपास २० ते ३० रॉकेटस विनातळावर डागण्यात आले आहेत . या हल्ल्यानंतर विमानतळ बंद करण्यात आलेलं आहे. हा हल्ला होण्याच्या काही तास आधी अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटीस काबूलच्या विमानतळावर उतरले होते. हिंदुस्थान दौरा केल्यानंतर ते अफगाणिस्तानला पोहोचले आहेत.
अफगाणिस्थानमधील स्थानिक वृत्तसंस्था टोलोने दिलेल्या वृत्तानुसार ज्या ठिकाणी रॉकेट हल्ला करण्यात आलेला आहे त्या विमानतळाजवळ नाटोचा बेस कँप आहे. दहशतवादयांना रॉकेट हल्ला विमानतळावर नाही तर नाटोच्या कँपवर करायचा होता असं या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.