रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररचं आव्हान संपुष्टात आलं आहे. २०वं ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या उद्देशानं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत उतरलेल्या फेडररला अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोने पराभूत केलं. पोट्रोने फेडररचा ७-५, ३-६,७-६(८), ६-४असा पराभव केला.

अटीतटीच्या या सामन्यात फेडररनंही हार मानली नव्हती. जवळपास २ तास ५० मिनिटे हा सामना रंगला. उपांत्यफेरीत डेल पोट्रोचा सामना स्पेनच्या राफेल नदालबरोबर होणार आहे. यावर्षीच्या अमेरिकन ओपन स्पर्धेत फेडररला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी कडवी झुंज दिली. पहिल्या सामन्यात फेडररने १९ वर्षीय अमेरिकी टेनिसपटू फ्रांसिस टायफोनेला ४-६, ६-२,६-१, १-६, ६-४ पराभूत केलं. तर दुसऱ्या सामन्यातही फेडररने संघर्षपूर्ण विजय मिळवला. रशियाच्या मिखाइल योजने विरुद्ध फेडररने ६-१, ६-७(३), ४-६, ६-४,६-२असा विजय मिळवला.