रोह्यात सॅम्पट्रान्स कंपनीत आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

94
roha-fire

सामना प्रतिनिधी । रोहा

रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीत सॅम्पट्रान्स कंपनीत आज सकाळी अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या आगीत जखमी वा जीवितहानी झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या प्रयत्नांना यश आले आहे. प्राथमिक तपासानुसार रबराला आग लागल्याचे स्पष्ट झाले असले तरी कारण अद्याप कळलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या