साडी माझी सखी…


रोहिणी हट्टंगडी

तुमची आवडती फॅशन – साडी

फॅशन म्हणजे काहीतरी वेगळे पण आपल्याला साजेसे वाटेल असे.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?- सलवार कमीज, साडी आणि जिन्स.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की? – केवळ कपडे नाही तर दागिने आणि हेअरस्टाईल पण त्यात आली.

आवडती हेअरस्टाईल?- फ्रेंच रोल आणि मोकळे केस.

फॅशन जुनी की नवी?- प्रसंगाप्रमाणे फॅशन फॉलो करायला आवडते.

आवडता रंग? – कोणताही ब्राईट रंग.

तुमच्या जवळच्यांना तुमची कोणती फॅशन आवडते साडी.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?- आवडते, पण फार जायला मिळत नाही.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता? – कपडे

ज्वेलरीमध्ये काय आवडते? – मला साजेसे दिसतील असे वेगवगेळ्या प्रकारचे दागिने.

आवडता ब्रॅण्ड फारसे तयार कपडे घालत नाही. मी कपडे शिवूनच घेते.

फॅशन फॉलो कशी करता? – मी कोणतेही कपडे आधी शिवून बघते जर मला ते चांगले वाटले तर मग ते घालते. सगळ्यांनाच सगळे कपडे चांगले वाटतील असे नसते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी? – निरिक्षण करते. बाहेर गेल्यावर, सेटवर अन्यजणी कसे कपडे घालते ते निरिक्षण करत असते.

ब्युटी सिक्रेट मी चेहऱयावर प्रयोग करत नाही. फार मेकअप करायला आवडत नाही.

टॅटू काढायला आवडेल का? मला तो फंडा अजूनही कळलेला नाही.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी काजळ पेन्सिल, लिपस्टिक, कॉम्पॅक्ट

फिटनेससाठी नियमित व्यायाम, पोषक आहार.