रोहित-जुईलीने केले त्यांचे पहिले मॅशअप

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरने आपल्या सुमधुर गीतांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता या दोघांनी एकत्र येत ‘तोळा तोळा- दिल दिया गल्ला’ हे मॅशअप गायले आहे. ‘जुईली आणि मी नुकतेच सोशल मीडियाकरून एक लाइव्ह सेशन केले होते. या लाइव्ह सेशनमध्ये बऱ्याच चाहत्यांनी तुम्ही एकत्र येऊन गावे, असा आग्रह धरला. त्यामुळेच मग हे गाणे आकाराला आले.’ तोळा-तोळा हे गाणे संजय जाधव यांच्या ‘तूहि रे’ चित्रपटामध्ये तेजस्विनी पंडित आणि सई ताम्हणकरने गायले होते. सोशल मीडियावर रोहितचे गाणे येताच तेजस्विनीने त्याला एका व्हिडीयोद्वारे शुभेच्छा दिल्यात.