ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

नुकतीच पार पडलेली विंडीजविरुद्धची मालिका अन् आगामी खडतर ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेता “हिटमॅन”  रोहित शर्माला हिंदुस्थानी  ‘अ’ संघातून विश्रांती देण्यात आली आहे. हा संघ न्यूझीलंडविरुद्ध अनधिकृत कसोटी खेळणार  आहे. याआधी सरावासाठी  ‘अ’ संघात रोहितचा समावेश करण्यात आला होता. ही लढत शुक्रवारपासून रंगणार आहे.रोहित १६ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीच्या संघाबरोबर मुंबईहून ऑस्ट्रेलियाला प्रयाण करणार आहे.

 हिंदुस्थानी “अ” संघात अजिंक्य रहाणे, मुरली विजय, हनुमा विहारी, पार्थिव पटेल आणि पृथ्वी शॉ याचाही समावेश आहे. हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची लढत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. हिंदुस्थान  ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही याकडे लक्ष वेधले होते.बीसीसीआयने आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यांसाठीचे हिंदुस्थानी संघ घोषित केले.

हिंदुस्थान  ‘अ’ वि. न्यूझीलंड ‘अ’ सामने :

  • पहिली कसोटीः (चारदिवसीय) १६ नोव्हेंबरपासून – माउंट माउंगानूइ,
  • दुसरी कसोटीः २३ नोव्हेंबरपासून हॅमिल्टन,
  • तिसरी कसोटीः ३० नोव्हेंबरपासून वाँगरेई,
  • पहिली वनडेः ७ डिसेंबर माउंट माउंगानूइ,
  • दुसरी वनडेः ९ डिसेंबर माउंट,
  • तिसरी वनडेः ११ डिसेंबर माउंट.

न्यूझीलंड”अ” विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी हिंदुस्थान “अ” संघ 

अजिंक्य रहाणे (कप्तान), मुरली विजय, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, पार्थिव पटेल, कृष्णाप्पा गौतम, शाहबाज नदीम, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, दीपक चहर, रजनीश गुरबानी, विजय शंकर, केएस भरत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हिंदुस्थानचा   टी -२०  संघ 

विराट कोहली (कर्णधार ), रोहित शर्मा (उप कर्णधार ), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, क्रुणाल पांड्या भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि  खलील अहमद।

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी  हिंदुस्थानी कसोटी संघ  

विराट कोहली (कर्णधार ), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, पार्थिव पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा , कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा,  भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड”अ” विरुद्धच्या  दुसऱ्या आणि  तिसऱ्या कसोटीसाठी  हिंदुस्थान “अ” संघ 

करुण नायर (कप्तान), रजनीश गुरबानी, विजय शंकर, केएस भरत, मयांक  अग्रवाल, ईशान किशन अभिमन्यु ईश्वरन, रविकुमार समर्थ, अंकित बावणे , शुभमन गिल, कृष्णाप्पा गौतम, शाहबाज नदीम, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, दीपक चहर