रोहित शर्माने तेंडुलकरचा विक्रम मोडला

सामना ऑनलाईन । इंदौर

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात इंदौरच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी हिंदुस्थानकडून खेळताना हा विक्रम सचिनच्या नावावर होता.

रोहित शर्माने आपल्या अर्धशतकीय खेळीदरम्यान ४ षटकार ठोकले. सामन्यात नॅथन कोल्टर-नाईल गोलंदाजीवर रोहितने सीमापार चेंडू टोलवताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा पहिला खेळाडू झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत ६२ षटकार ठोकले आहेत. यासोबतच त्याने सचिनचा ६० आणि न्यूझीलंडचा आक्रमक खेळाडू ब्रॅण्डन मॅक्युलमचा ६१ षटकारांचा विक्रम मोडला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू

१) रोहित शर्मा (हिंदुस्थान) – ६२ षटकार*
२) ब्रॅण्डन मॅक्युलम (न्यूझीलंड) – ६१ षटकार
३) सचिन तेंडुलकर (हिंदुस्थान) – ६० षटकार
४) ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – ५३ षटकार

रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले तो क्षण…