उमर खालिद तुमचा कोण लागतो?

1

rokhthokभीमा-कोरेगावातून सुरू झालेली दंगल महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला कलंक आहे. या सगळ्यामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप केला जात आहे, पण शनवारवाड्यासमोरील ‘एल्गार’ परिषदेस उमर खालिदला बोलावून आयोजकांनी कोणती क्रांती केली? कोण लागतो हा उमर खालिद तुमचा?

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा मुखवटा गळून पडला आहे. देशाचा ‘सेक्युलर’ म्हणजे धर्मनिरपेक्ष ढाचा व फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे पुरोगामित्व ‘नकली’ ठरवले आहे. जातीय व धार्मिक स्वार्थाचे राजकारण आता सगळ्यांनाच करायचे आहे. ‘रोटी-कपडा-मकान’ या प्रश्नावर लोक आता उसळून उठत नाहीत. शेतकरी, बेरोजगारी हे प्रश्न त्यांना महत्त्वाचे वाटत नाहीत. देशाच्या सीमांवर रोज होणाऱ्या चकमकी व सैनिकांच्या मृत्यूंवरही त्यांचे रक्त सळसळत नाही, पण जात व धर्माच्या अस्मितेसाठी सर्वच ‘जात’वाले रस्त्यावर उतरतात व माणसांना मारतात, जाळतात. हे लक्षण अराजकतेच्या धोक्याची घंटा वाजवणारे आहे!

का मारले?
नितीन फटांगळे या तरुणास भीमा-कोरेगावात दगडाने ठेचून मारले. घरात नळाची दुरुस्ती करण्यासाठी त्याला काही सामान हवे होते ते आणण्यासाठी तो बाजारात गेला. तोपर्यंत गावात हिंसाचाराची सुरुवात झाली होती. नितीनच्या अंगावर जे ‘टी शर्ट’ होते त्यावर छत्रपतींचा फोटो होता व त्यामुळे एका जमावाने त्या निरपराध तरुणाची हत्या केली. हे जर खरे असेल तर राज्यात नेमके कोणते विष भिनले आहे ते समजून येईल. पाकिस्तानातील अतिरेक्यांनाही जे जमले नाही तो विध्वंस आता आपला आपणच करून घेत आहोत. हाफिज सईदला जे अशक्य आहे ते भीमा-कोरेगाव घटनेने ‘शक्य’ केले व आपणच महाराष्ट्राच्या एकतेच्या डोक्यात खिळा मारून घेतला. महाराष्ट्रात आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत व त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. महाराष्ट्रातील ‘बौद्ध’ बांधवांना गुजरातचा जिग्नेश मेवानी व दिल्लीचा बदफैली उमर खालिदचे नेतृत्व मान्य आहे काय? याचा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी प्रामुख्याने करायला हवा.

हे शौर्य कसले?
भीमा-कोरेगावच्या दंगलीत हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप श्री. शरद पवारांपासून प्रकाश आंबेडकर करतात तेव्हा आश्चर्य वाटते. मग भीमा-कोरेगावच्या ‘शौर्य’दिनी उमर खालिद नावाच्या महात्म्यास ज्यांनी आमंत्रित केले ते शौर्य होते की देशद्रोह? दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘देशद्रोहा’चे एक प्रकरण गाजले. त्यात कन्हैयाकुमार व उमर खालिद हे आरोपी होते. विद्यापीठात संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूचा स्मृतिदिन साजरा करण्याचे ‘कार्य’ याच उमर खालिदने पार पाडले. ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘भारत तेरे तुकडे होंगे’, ‘भारत की बरबादी तक जंग’ अशा विखारी घोषणा देण्यात आल्या व त्याचे नेतृत्व उमर खालिदने केले. असा हा उमर खालिद कुणाच्या निमंत्रणावरून पुण्याच्या एल्गार परिषदेस आला? संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचे नाव दंगलखोर म्हणून ज्यांनी घेतले त्या नेत्यांनी उमर खालिदचे नाव घेतले नाही, ही कसली धर्मनिरपेक्षता?

गुलामांचे राज्य
ज्यांनी खालिद उमरचा पायचाटेपणा केला, त्यांच्यावर आधी देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. ‘हिंदुस्थानी लष्कराशी झालेल्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी बुऱहान वाणी हा ‘शूर’ होता. बुऱहान वाणी हा मृत्यूला घाबरणाऱ्यांपैकी नव्हता. त्याला भय हे गुलामगिरीत जगण्याचे होते,’ असे उमर खालिद म्हणतो. म्हणजे तो सरळ सरळ पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला पाठिंबा देतो आणि हाच उमर खालिद ब्रिटिशांनी उभारलेल्या शौर्यस्तंभास अभिवादन करण्यासाठी बोलावला जातो. त्यामुळे सर्वात आधी ‘गुन्हा’ दाखल व्हायला हवा उमर खालिदच्या महाराष्ट्रातील यजमानांवर! मग इतर सगळय़ांवर. पण या ढोंगाचा बुरखा कितीजणांनी फाडला? श्री. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव लढ्याचे ‘पुढारी’पण स्वीकारले. हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील, असे एक भयंकर विधान त्यांनी केले; पण उमर खालिदचा खरा ‘बाप’ हाफिज सईद आहे याचा विसर त्यांना पडला. दंगलीच्या दिवशी संध्याकाळी श्री. आंबेडकर हे अर्णव गोस्वामींच्या ‘डिबेट’ कार्यक्रमात सहभागी झाले. गोस्वामी यांनी आंबेडकर यांना पहिलाच प्रश्न विचारला तो असा – ‘‘मि. आंबेडकर, उमर खालिद हा माणूस देशाच्या सर्वोच्च संसदेवर अतिरेकी हल्ला करून सुरक्षा रक्षकांचा बळी घेणाऱया अफजल गुरूचा समर्थक होता आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये देशद्रोही घोषणा देणाऱया विद्यार्थ्यांचा तो नेता होता आणि अत्यंत चिथावणीखोर व देशद्रोही घोषणा देणाऱ्यांमध्ये तो आघाडीवर होता. या दोन गोष्टींशिवाय त्याच्या नावावर तिसरा कोणताही ‘पराक्रम’ रजिस्टर नाही. मग अशा इसमामध्ये तुम्ही अशी कोणती गोष्ट बघितली की, शनवारवाड्यासमोर झालेल्या ‘एल्गार’ परिषदेमध्ये त्याला तुम्ही प्रमुख वक्ता म्हणून सन्मानाने आमंत्रित केले होते!
प्रकाश आंबेडकर या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत!

नवा एल्गार
शनवारवाड्याच्या ‘एल्गार’ परिषदेचेच पडसाद भीमा-कोरेगावात उमटले. दिल्लीत चार दहशतवादी पकडले व २६ जानेवारीस स्वातंत्र्यदिनी होणाऱया हल्ल्याचा कट उधळून लावला असे सांगण्यात आले, पण महाराष्ट्रातील जातीय दंगलींचा ‘कट’ पोलिसांना उधळून लावता आला नाही. ज्या महाराष्ट्रात डॉ. आंबेडकर जन्मास आले त्या महाराष्ट्रातील ‘बौद्ध’ समाजास गुजरातचे मेवानी व पाक समर्थक खालिद उमरचे नेतृत्व प्रिय वाटत असेल तर तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव ठरेल, याचा विचार कोणी करणार की नाही? या सर्व प्रकारानंतर महाराष्ट्रातील मने दुभंगली आहेत व कटुता वाढली आहे. हे चित्र पाहून पाकिस्तानात बसलेला हाफिज सईद टाळय़ा वाजवीत असेल.

महाराष्ट्राचे भविष्य अंधकारमय करणारे भीमा-कोरेगावचे प्रकरण आहे. महार रेजिमेंटने पेशव्यांविरुद्ध युद्ध जिंकले. पेशवे इंग्रजांविरुद्ध हरले. इंग्रजांनी देश गुलामीच्या बेड्यात जखडवला व दीडशे वर्षे आपण पारतंत्र्यात राहिलो. त्या ‘शौर्या’चा एल्गार पेटविण्यासाठी आमंत्रित केले खालिद उमरला!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रहिताला महत्त्व दिले. राष्ट्रहितास बाधा येईल असे त्यांनी काही केले नाही. आंबेडकरांचे महात्मा गांधींशी मतभेद होते. म्हणून त्यांनी बॅ. मोहम्मद अली जीनांची पालखी वाहिली नाही व हिंदुस्थानातील जातीयवादाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी पाकिस्तानची मदत घेतली नाही. उमर खालिदसाठी शनवारवाड्यांसमोर पायघड्या घालणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. आंबेडकर हे भीमा-कोरेगावच्या शौर्य स्मारकास कधी भेट देण्यासाठी गेले होते काय? तसा पुरावा नसल्याचे मी मागच्या रविवारी याच संदर्भात म्हटले होते. ते विधान चुकीचे ठरविणारे पुरावे काही मंडळींनी माझ्याकडे पाठवले. मी त्यांचा आदर करतो. सुशील म्हस्के यांनी एक छायाचित्र पाठवले. त्यात डॉ. आंबेडकर हे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आहेत. ‘‘आपले खापर सासरे शिवराम जानबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मानवंदना दिली. अजून पुरावे पाहिजे असतील तर तेदेखील आहेत,’’ असे श्री. म्हस्के म्हणतात. त्यांच्यासह सगळ्यांच्याच भावनेचा मी आदर करतो. डॉ. आंबेडकर हे त्यांच्या सहकाऱ्यांसह भीमा-कोरेगावच्या स्मृतिस्तंभावर गेले व मानवंदना दिली, पण शौर्याचा व अस्मितेचा एल्गार पेटविण्यासाठी त्यांनी एखाद्या उमर खालिदला आमंत्रित केले नव्हते.

हा उमर खालिद तुमचा-आमचा कोण लागतो?

या प्रश्नाचे उत्तर कोणी द्यायचे?

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल आयडी – [email protected]

8 प्रतिक्रिया

 1. Jabardast vichar mandlet sanjay raut saheb!!!maharashtra hya band aani dangyanmule 10-12 varsh punha mage gela aahe…hya lokana fakt purvajanchya shauryache diwas sajre karaychet…swata kartutvashunya…hyach upatsumbh lokanchya swabhamule maharashtrache nahak 800 koti rupayanche nuksaan jhale aahe…dalit janta kayam sanghtit hoti pan tyana durdaivane netrutva kadhich changle milale nahi baba sahebanantar…ekikade ramdas athawale aahe jo fakt swatachya mantripadasathi bhandto aani hya praksh ambedkarla koni vicharat nai…evdhach jar jor asel “”ambedkari”” jante madhe tar mehnat karavi aani maharashtrachya vikasala haatbhar lawawa…tyadivshi khara yancha shaurya diwas hoil aani mi ek maratha mhanun shabd deto tya diwshi mi tyanchyasobat shaurya diwas sajra karel…
  Maharashtrache khare tar durdaiv aahe ki jya maharana,dalitana maharajani sainyat sahbhagi kele,tech aaj tyana galicch ashya ghosna det hote…saddhya kahich jjale nai hyachyatun tyana..ek diwas aawaj kela fakt…dusrya diwshi punha bhande ghasaycech kaam karnar aahet hi lok…sarkari kubdyancha aadhar gheun majlet aani bighadli aahe hi ambedkari janta…hyanchya kubdya kadhun ghyava lagtil tevha hyanchi ladhai chalu hoil astitvachi…mag baghuya hyancha shaurya diwas kasa sajra hoto te….

 2. योग्य बोललात. मुख्य म्हणजे खालिद सारखी मंडळी इथल्या तरुणांना भडकवु शकतात हा आंबेडकरी विचारधारेचा पराभव आहे. सभा घेण्याची परवानगी नाकारली तर तो लोकशाहीचा अपमान ठरवण्यात येतो.सैरभैर झालेल्या आंबेडकरी चळवळीतील लोकांनी नवे परजातीय नेत्रूत्व शौधायला हवे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उंचीचा एकही निपजत नाही हे त्या समाजाचे दुर्दैव.
  उत्तम लेख लिहिलात। …….

  • मला वाटतं सम्पादक साहेब
   आपुल्या विचारांचा आदर करून माझं
   मत भीमा कोरेगाव
   व आपुला रोखठोक विषय
   मत मांडत आहे . जे
   भ्याड हल्लात बायका पोरां संग
   गर्भवती सह दगड खात
   होती त्यांची बाजू विचारात घेणं
   आवशकता वाटते

   बातमी
   नुसार कालच कल्याण मध्ये
   सात तरुण कल्याण : नक्षली
   संघटनेतील 7 संशयितांना एटीएसनं ताब्यात
   घेतल…कल्याण :बघा जात
   धर्मं ची पेरणी केली
   अन आम्ही अन्यायाला जात
   धर्मं ने बघत राहिलो
   तर हे तरुण नक्षली
   बनतील तेव्हा वेळ निघून गेली
   असेल .प्रतेक भारतीयांचे कर्तव्य आहे देशांची कायदा
   सुव्यवस्था राखणे .राहिला प्रश्नं
   एल्गार (alagar parishad) भीमा कोरेगाव
   भ्याड हल्ला व पुण्यातिल
   सभा एल्गार (alagar parishad ह्या दोन
   भिन्न घटना आहेत
   .क्रूपया लक्षात घ्यावं . त्या दिवशी
   भीमा कोरे गांव येथे
   जे लोकं गेले होते
   ते शौर्य दीना साटी
   व संभाजी महाराज यांच्या दर्शन साटी
   गेंले होते . जे माणूसपण
   नाकारणारे होते त्यांनी
   फुले घेऊन येणाऱ्यावर जगाच्या
   इतिहासात प्रथमच दगडी मारली
   गेली फक्तं जात श्रेष्ट
   हया तालीबानी अहंकार पायी ह्याचा अभ्यास
   करावा सम्पादक साहेब नी मग
   लेख .आहे भीमा कोरेगाव
   ला अभिवादन करण्या साठी माझे
   70वर्ष वयाचे वडील गेले
   होते मग पुण्यातील एल्गार सभा
   व भ्याड हल्ला यांचं
   सबंध काय . जर वेळेचं
   योग्य कारवाई झाली नाही तर
   मन तुटली जातील हे
   नक्की .हे सर्व खरं
   असले तरी मरांठा समाजांनी
   मोट्या भावांची भूमिका घेऊन समाजात दुही पसरवीणाऱ्यांची
   स्वप्न भग्न केले हे
   ही नसे थोडके जय
   भीम जय शिवाजी .कोणताही
   रोग होई पर्यंत
   माणसाला व्यसन वाईट वाटत
   नाही तो त्यांतच
   आनंद मानतो तसेच आहे
   जात धर्म व्यसन
   .चला व्यसना पासून दूर
   ! आपुला भारतीय बंधू प्रदीप सोनवणे

 3. SANJAY RAUT yanna itihasachi yogya jankari naslyamule te itihas khota sangtahet. ardhi mahiti kinva hoti mahiti hi mahabhartatil “naro va kunjaro va” sarkhich aahe. tyanna MARATHE ANI PESHVYATIL FARAKACH MAHIT NAHI. PESHVE HE CHHATRAPATINCHYA VARSANNA MAGE SARUN SWATHA GADIVAR BASLE, TYANNI ITHLYA DALIT, BAHUJANNAVAR ANANVIT ATYACHAR KELE. TYA ATYACHARAVIRUDDHA HE YUDDHA HOTE. HE SWABHIMANASATHI HOTE.

 4. काही मुद्दे, जरूर वाचा पण मनात कोणा बद्दल द्वेष न ठेवता, मग विचार करा.

  १. शिवसेना पुन्हा एकदा फक्त बौद्ध समाजास टार्गेट करते, अनेक बौद्धांनी बाळासाहेबांप्रति निष्ठा राखली, पण आज हे फळ.हरकत नाही पण लक्षात ठेवू. एल्गार परिषदेतील आयोजक आंबेडकरी आणि डाव्या विचारांचे होते. त्यात अनेक समाजातील लोक होते. मराठा आणि मुस्लिम ही.
  २. उमर खालिद ला खुशाल फाशी द्या, सरकार तुमचं आहे, कायदा तुमच्या हातात आहे. गुन्हा सिद्ध करा, दोषी ठरवा आणि योग्य ती शिक्षा द्या. ते न करता हाताची घडी घालून बसण्यात काय अर्थ?
  ३. जीग्नेश मेवाणी तरुण आणि नवीन नेतृत्व म्हणून पुढे येत असेल तर त्याला पाठिंबा देण्यात काय गैर? जीग्नेश फक्त महाराष्ट्र नाही देशातील दलित जनते साठी एक प्रेरणा बनून पुढे आलाय. तुम्ही खुशाल लिहिलंत, ‘बौद्ध’ बांधवांना ‘गुजरातचा’ जीग्नेश नेतृत्व म्हणून चालेल का? का नाही? देशाचं नेतृत्व ‘गुजरातचे’ मोदी करतात आणि त्या सरकारचा तुम्ही भाग आहात हे सोयीस्करपणे विसरता. तुम्हाला ‘गुजरातचे’ मोदी कसे चालतात?
  ४. कोरेगाव भीमा मध्ये मानवंदना द्यायला आलेल्या जनतेवर दगड फेक करणारे एल्गार परिषदेतून आले होते का? त्यांना कोणी पाठवले होते? त्यांचा धनी कोण? दगड फेक कोणी सुरू केली, सगळं कॅमेऱ्यात कैद आहे, डोळे उघडून पहा.
  ५. कोरेगाव भीमा च्या युद्धात महार रेजिमेंट नसून 1st Regiment of Bombay
  Native Infantry होती. ज्यात बहुतांश सैनिक महार होते आणि त्याचबरोबर मराठे आणि राजपूत होते. Ref: https://en.m.wikipedia.org/wiki/Battle_of_Koregaon

  ६. कोरेगाव भीमा ला जे झालं त्याची पार्श्वभूमी काय, हे लक्षात घेतलं तर अनेक बाजू स्पष्ट होतात. प्रवीण गायकवाड यांची ही मुलाखत जरूर पहावी. https://youtu.be/gMfKTD4u-Bo
  प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेड चे पूर्व अध्यक्ष.
  ७. पुन्हा एकदा, आंबेडकरी जनतेचे आंदोलन कोणत्याही जाती विरोधात कधिच नव्हते आणि नसेल. ते नेहमी मनुवादी जातीव्यवस्थे विरुद्धच असेल. कृपया कोणीही जाती जातीत तेढ निर्माण करू नका. आंबेडकरी जनता हे अनेक जाती धर्मांची आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा त्याचा गाभा आहे.

  ज्या वाटेने शिवसेना जात आहे, प्रश्न उपस्थित होतो; तुम्ही आंबेडकरी जनतेचे कोण?

  जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम!!!

  • भीमा
   कोरे गाव दुसरी
   बाजू

   To:

   Cc:

   मला वाटतं सम्पादक साहेब
   आपुल्या विचारांचा आदर करून माझं
   मत भीमा कोरेगाव
   व आपुला रोखठोक विषय
   मत मांडत आहे . जे
   भ्याड हल्लात बायका पोरां संग
   गर्भवती सह दगड खात
   होती त्यांची बाजू विचारात घेणं
   आवशकता वाटते

   बातमी
   नुसार कालच कल्याण मध्ये
   सात तरुण कल्याण : नक्षली
   संघटनेतील 7 संशयितांना एटीएसनं ताब्यात
   घेतल…कल्याण :बघा जात
   धर्मं ची पेरणी केली
   अन आम्ही अन्यायाला जात
   धर्मं ने बघत राहिलो
   तर हे तरुण नक्षली
   बनतील तेव्हा वेळ निघून गेली
   असेल .प्रतेक भारतीयांचे कर्तव्य आहे देशांची कायदा
   सुव्यवस्था राखणे .राहिला प्रश्नं
   अल्गार भीमा कोरेगाव
   भ्याड हल्ला व पुण्यातिल
   सभा ह्या दोन
   भिन्न घटना आहेत
   .क्रूपया लक्षात घ्यावं . त्या दिवशी
   भीमा कोरे गांव येथे
   जे लोकं गेले होते
   ते शौर्य दीना साटी
   व संभाजी महाराज यांच्या दर्शन साटी
   गेंले होते . जे माणूसपण
   नाकारणारे होते त्यांनी
   फुले घेऊन येणाऱ्यावर जगाच्या
   इतिहासात प्रथमच दगडी मारली
   गेली फक्तं जात श्रेष्ट
   हया तालीबानी अहंकार पायी ह्याचा अभ्यास
   करावा सम्पादक साहेब नी मग
   लेख .आहे भीमा कोरेगाव
   ला अभिवादन करण्या साठी माझे
   70वर्ष वयाचे वडील गेले
   होते मग पुण्यातील सभा
   व भ्याड हल्ला यांचं
   सबंध काय . जर वेळेचं
   योग्य कारवाई झाली नाही तर
   मन तुटली जातील हे
   नक्की .हे सर्व खरं
   असले तरी मरांठा समाजांनी
   मोट्या भावांची भूमिका घेऊन समाजात दुही पसरवीणाऱ्यांची
   स्वप्न भग्न केले हे
   ही नसे थोडके जय
   भीम जय शिवाजी .कोणताही
   रोग होई पर्यंत
   माणसाला व्यसन वाईट वाटत
   नाही तो त्यांतच
   आनंद मानतो तसेच आहे
   जात धर्म व्यसन
   .चला व्यसना पासून दूर
   ! आपुला भारतीय बंधू प्रदीप सोनवणे

 5. सामनाचा “रोखठोक” प्रचंड गाजला…!!

  मराठी माणसाच्या मनातील खदखद आज बाहेर पडली…!!

  वाचकांचा तुफान प्रतिसाद…!!

  धन्यवाद सामना…!!

  धन्यवाद संजयजी राऊत…!!

  उमर खालिद तुमचा कोण लागतो..??https://t.co/6PLBYIkfAW

 6. भीमा
  कोरे गाव दुसरी
  बाजू

  To:

  Cc:

  मला वाटतं सम्पादक साहेब
  आपुल्या विचारांचा आदर करून माझं
  मत भीमा कोरेगाव
  व आपुला रोखठोक विषय
  मत मांडत आहे . जे
  भ्याड हल्लात बायका पोरां संग
  गर्भवती सह दगड खात
  होती त्यांची बाजू विचारात घेणं
  आवशकता वाटते

  बातमी
  नुसार कालच कल्याण मध्ये
  सात तरुण कल्याण : नक्षली
  संघटनेतील 7 संशयितांना एटीएसनं ताब्यात
  घेतल…कल्याण :बघा जात
  धर्मं ची पेरणी केली
  अन आम्ही अन्यायाला जात
  धर्मं ने बघत राहिलो
  तर हे तरुण नक्षली
  बनतील तेव्हा वेळ निघून गेली
  असेल .प्रतेक भारतीयांचे कर्तव्य आहे देशांची कायदा
  सुव्यवस्था राखणे .राहिला प्रश्नं
  एल्गार (alagar parishad) भीमा कोरेगाव
  भ्याड हल्ला व पुण्यातिल
  सभा एल्गार (alagar parishad ह्या दोन
  भिन्न घटना आहेत
  .क्रूपया लक्षात घ्यावं . त्या दिवशी
  भीमा कोरे गांव येथे
  जे लोकं गेले होते
  ते शौर्य दीना साटी
  व संभाजी महाराज यांच्या दर्शन साटी
  गेंले होते . जे माणूसपण
  नाकारणारे होते त्यांनी
  फुले घेऊन येणाऱ्यावर जगाच्या
  इतिहासात प्रथमच दगडी मारली
  गेली फक्तं जात श्रेष्ट
  हया तालीबानी अहंकार पायी ह्याचा अभ्यास
  करावा सम्पादक साहेब नी मग
  लेख .आहे भीमा कोरेगाव
  ला अभिवादन करण्या साठी माझे
  70वर्ष वयाचे वडील गेले
  होते मग पुण्यातील एल्गार सभा
  व भ्याड हल्ला यांचं
  सबंध काय . जर वेळेचं
  योग्य कारवाई झाली नाही तर
  मन तुटली जातील हे
  नक्की .हे सर्व खरं
  असले तरी मरांठा समाजांनी
  मोट्या भावांची भूमिका घेऊन समाजात दुही पसरवीणाऱ्यांची
  स्वप्न भग्न केले हे
  ही नसे थोडके जय
  भीम जय शिवाजी .कोणताही
  रोग होई पर्यंत
  माणसाला व्यसन वाईट वाटत
  नाही तो त्यांतच
  आनंद मानतो तसेच आहे
  जात धर्म व्यसन
  .चला व्यसना पासून दूर
  ! आपुला भारतीय बंधू प्रदीप सोनवणे

  see more0

  Edit

  Reply

  Share ›

  Twitter

  Facebook