खवय्या कपल्ससाठी बेस्ट डेस्टीनेशन

सामना ऑनलाईन। मुंबई

अनेकजणांना फिरण्याबरोबरच खाण्यापिण्याचाही शौक असतो. पण बऱ्याचवेळा बाहेर कुठे फिरायला गेल्यावर तिथे मिळणारे खाद्यपदार्थ आवडतीलचं असे नाही. यामुळे पिकनिकचा मूडच निघून जातो. अशा खवय्यांसाठी आपल्या देशात काही खास डेस्टीनेशन आहेत. जिथे तुम्ही फिरण्याबरोबरच विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

gate-of-india-1

 मुंबई

महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांबरोबर झणझणीत वडा पाव म्हणजे मुंबईची जान. त्याचबरोबर पारशी डिशेससाठीही मुंबई प्रसिद्ध आहे. येथे मिळणारी पाणी पुरीही प्रसिद्ध आहे.

काय बघाल… गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली दर्गा, नेहरू तारांगण, नेहरू विज्ञान केंद्र, वरळी वांद्रे सेतू, मरिन ड्राईव्ह, जूहू समुद्र किनारा, सिद्धिविनायक मंदिर, राणीचा बाग, नॅशनल पार्क, कान्हेरी गुंफा.

kolkata-1

कोलकाता

पश्चिम बंगालमधलं कोलकाता म्हणजे मासे शौकीनांच आवडतं शहर. त्यातच जर तुम्हाला मिठाई आवडत असतील तर कोलकाता तुमच्यासाठी बेस्टच आहे. येथे मिळणारी पुचका म्हणजे पाणीपुरी बघितली कि किती खाऊ आणि किती नाही असं तुम्हांला होऊन जाईल. येथे मिळणारे चिकन रोल्स, बिर्याणी देशात दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत.

काय बघाल…हावडा ब्रिज, सुंदरबन, व्हिक्टोरिया मेमेरियल, बारा मीनार

gate-way-indiaहैदराबाद

हैदराबाद फक्त चारमिनारसाठी प्रसिद्ध नाही तर येथे मिळणाऱ्या मोगलाई जेवणासाठीही प्रसिद्ध आहे. मोगलाई जेवण, टर्किश व अरेबिक खाद्यपदार्थ, कच्च्या मटनाची बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, कराची बिस्किटं ही हैदराबादची खासियत आहे.

काय बघाल…चारमिनार, रामोजी फिल्म सिटी, बिर्ला मंदिर.

nainital-2नैनीताल

जर तुम्हांला बोटींग व डोंगर रांगात फिरण्याबरोबरच चमचमीत खाण्याचा शौक आहे. तर नैनीताल तुमच्यासाठी बेस्ट डेस्टीनेशन आहे. येथे मिळणारी बाल मिठाई, स्पेशल मोमोज, बटाट्याचे गुटके, गुलगुले एकदम लाजवाब.

काय बघाल…टिफीन टॉप,नैनी पिक, नंदा देवी मंदिर, मॉल रोड.

jaipur-4

जयपूर

जर तुम्हांला इतिहासाची आवड असेल त्याचबरोबर पारंपारिक खाद्यपदार्थांची चव चाखायची असेल तर जयपूरला नक्की जा. येथील दाल-बाटी चूर्मा,गट्टे ची भाजी ,लाल मांस व पापडाच्या भाजीचा नक्की स्वाद घ्या.

काय बघाल...येथील ऐतिहासिक किल्ले व त्यांचं राजसी सौंदर्य अजूनही कायम आहे.