कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट, रोनित ठाकूरचे नाबाद द्विशतक

20

सामना ऑनलाईन । मुंबई 

29 व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषकाच्या साखळीतील तिसऱ्या सामन्यात कलिना विभाग ‘अ’ संघाने रोनित ठाकूरने केलेल्या नाबाद 248 धावांची धडाकेबाज खेळीच्या बळावर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आरामात मजल मारली.

रोनितने 414 चेंडूंत 41 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद द्विशतकी खेळी साकारली. कलिना विभाग ‘अ’ संघाने विरार विभाग ‘अ’ संघाविरुद्ध 519 धावांचा डोंगर रचला त्यात राजसिंग देशमुख 113, रोनित ठाकूर 248 यांनी दुसऱ्या विकेटसाठी 246 धावांची भागीदारी केली. आणि उपांत्य फेरीत मजल मारली. उपांत्य फेरीचे सामने उद्या 21 आणि परवा 22 मे रोजी माटुंग्याचा रमेश दडकर मैदानात होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या