रॉस टेलरचा शतकी धमाका

1

सामना ऑनलाईन । हॅमिल्टन

रॉस टेलरचे धडाकेबाज १८ वे शतक… मिचेल सँटनरची अष्टपैलू चमक… टॉम लॅथमच्या शानदार ७९ धावा… आणि ट्रेंट बॉल्ट, टीम साऊथीसह इतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने रविवारी इंग्लंडला ३ गडी व ४ चेंडू राखून हरवले आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यावेळी रॉस टेलरची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

इंग्लंडकडून मिळालेल्या २८५ धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने ७ गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. रॉस टेलरने १२ चौकारांनिशी ११३ धावांची अफलातून खेळी साकारली. टॉम लॅथमने ७९ धावा करीत त्याला उत्तम साथ दिली. अखेरच्या क्षणांमध्ये मिचेल सँटनरने नाबाद ४५ धावा करीत न्यूझीलंडचा विजय निश्चित केला.