पाण्यावर चालणारी लक्झरी कार; किंमत फक्त 1.78 कोटी, 114 कि.मी.चा स्पीड

9

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगभरात रोज नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. रस्तेवाहतुकीमध्ये ट्राफिकची समस्या वाढत असल्याने हवाई आणि पाण्यावर चालणाऱ्या विविध वाहनांची चाचणी सध्या सुरू आहे. इटलीच्या जेट कॅप्सूल (Jet Capsule) नावाच्या कंपनीने अशीच एक लक्झरी कार (नाव) बनवली आहे.

royal-version-0011

‘रॉयल व्हर्जन 001’ नावाच्या या जेटची कारची किंमत 2 लाख 50 हजार डॉलर (एक कोटी 78 लाख) रुपये इतकी आहे. याद्वारे पाण्यावर चालणाऱ्या कारसारखी मजा घेता येणार आहे. या जेटमध्ये अनेक लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत.

royal-version-0012

पाण्यावर चालणाऱ्या या जेटची लांबी 26 फूट असून रुंदी 12 फूट आहे. यात एक पायलट म्हणजे ड्रायव्हर आणि 8 ते 10 प्रवासी बसू शकतात. या जेटच्या मागच्या बाजूला एक बाथरूम आणि छोटा बारही आहे. याचा बुलेट प्रूफ ग्लासही लावण्यात आली आहे.

royal-version-0010

या जेटमध्ये 370 एचपी ते 1040 एचपी पॉवर रेंज वाचे डिझेल इंजिन लावण्यात आले आहे. त्यामुळे या जेटचा स्पीड 114 किलोमीटर प्रति तास इतका झाला आहे. कंपनीने या जेटमध्ये ग्राहकाच्या इच्छेनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन सेटअपही दिला आहे.