“हा’ खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दक्षिण आफ्रिकेतील 2007 चा पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी करणारा हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज रुद्रप्रताप सिंगने अखेर ट्विटरवरून आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

rp-singh

क्रिकेटवेडय़ा हिंदुस्थानमध्ये या खेळात इतकी स्पर्धा आहे की, प्रत्येक खेळाडूला मैदानावर निवृत्त होण्याची संधी मिळतेच असे नाही. मंगळवारी रात्री भावनिक ट्विट करत 32 वर्षीय आर. पी. सिंगने निवृत्तीची घोषणा केली. गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानी संघातून बाहेर असणाऱ्या आर. पी. सिंगने सप्टेंबर 2011 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्याने 14 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामन्यांत हिंदुस्थानी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 4 सप्टेंबर 2005 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्याच दिवशी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. कसोटीमध्ये आर.पी.च्या नावावर 40, एकदिवसीय सामन्यांमध्ये 69, तर टी-20मध्ये 16 बळी आहेत.