‘डाऊन’ येणाऱ्या प्रवाशांवर आरपीएफकडून कारवाई

3
mumbai-local-001
प्रातिनिधिक फोटो


सामना ऑनलाईन । अंबरनाथ

अंबरनाथ लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीचे प्रवासी उलटे बसून येत असल्याने अंबरनाथच्या प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो, या विरोधात प्रवाशांनी आवाज उठवल्यानंतर रेल्वे पोलीस खडबडून जागे झाले. आज रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती कळते आहे.

आज सकाळी अंबरनाथ रेल्वे स्थानकात रेल्वे अधिकारी आणि रेल्वे पोलिसांनी डब्यात जाऊन उलटे बसून आलेल्या प्रवाशांना उठवलं आणि अंबरनाथकर रेल्वे प्रवाशांना जागा मिळवून दिली. असे असले तरी एक दिवसाच्या कारवाईने हा प्रकार थांबणार नाही, म्हणून प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या