मोहन भागवत यांच्या ताफ्याला अपघात, सरसंघचालक सुखरूप

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. शुक्रवारी यमुना एक्स्प्रेस-वेवरून त्यांच्या गाड्यांचा ताफा मथुरा येथे जात होता. मात्र प्रवासादरम्यान त्यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातात सरसंघचालक मोहन भागवत यांना काहीही दुखापत झालेली नसून ते सुरक्षित आहेत.

मथुराच्या सुरीर परिसरात मोहन भागवत यांच्या ताफ्यातील एका गाडीचा टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याचं समोर येत आहे. अपघातानंतर मोहन भागवत दुसऱ्या गाडीने नियोजित स्थळी निघून गेले. मथुरामध्ये त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे.