माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू

2

सामना ऑनलाईन, पुणे

पुण्याजवळ एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विनायक शिरसाट असे या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. गेले 8 दिवस शिरसाट बेपत्ता होते. याबाबतची तक्रार भारती विद्यापीठ पोलिसांत दाखल करण्यात आली होती. आज पहाटे त्यांचा मृतदेह ताम्हणी घाटामध्ये आढळून आला आहे.