सिंहाला गोंजारणं खेळाडूला पडलं महागात

सामना ऑनलाईन । केपटाऊन

जंगलचा राजा सिंह हा पिंजऱ्यात असो वा जंगलात तो कायम राजाच असतो. त्याच्या जवळ कोणी फिरकलं तरी त्याला ते आवडत नाही. मग कुत्र्यामांजरासारखं गोंजारण त्याला कसं आवडेल. असाच काहीसा अनुभव आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू स्कॉट बाल्दविन याला आला आहे.

आफ्रिकेतल्या व्लेल्टरविन गेमच्या मैदानात टीमबरोबर फिरायला गेलेल्या स्कॉटने तिथे पिंजऱ्यात ठेवलेल्या सिंहाला गोंजारण्याचा प्रयत्न केला असता चिडलेल्या वनराजाने त्याचा हातच जबड्यात पकडला. पण सुदैवाने स्कॉटने सिंहाच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

पण यावेळी स्कॉटच्या हातात सिंहाचे दात रुतल्याने त्याला दुखापत झाली. यामुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी स्कॉटलाच दोष दिला आहे.