स्वच्छतेचे नियम

 अंघोळीनंतर स्वच्छ धुतलेला टॉवेल वापरा. न धुतलेल्या टॉवलमध्ये असलेल्या जिवाणूंमुळे त्वचाविकार होऊ शकतात.

 टॉवेल रोज किंवा एक दिवसाआड धुवा. मळलेल्या टॉवलमुळे खाज, खरुज, त्वचेवर रॅश येणे, असे आजार होतात.

 टॉवलने अंग आणि डोके जोराने न घासता हलक्या हाताने पुसा. नाहीतर त्वचा कोरडी होईल. त्वचेचा ओलावाही नष्ट होऊ शकतो.

 दुसऱ्यांचा टॉवेल वापरू नका. यामुळे ऍलर्जीचे जिवाणू त्वचेवर पसरून त्वचेचा कोमल, मुलायमपणा नष्ट होईल.

 टॉवेल नेहमी उन्हात वाळवा. न्हाणीघरात ठेवू नका. कारण न्हाणीघरातील त्वचेला हानीकारक रोगजंतू टॉवेलमध्ये जाऊ शकतात.

 नेहमी मऊ टॉवेल वापरा. जास्त कठीण दोऱ्याच्या तंतूपासून बनवलेल्या टॉवेलमुळे त्वचा कोरडी होऊ शकते.