‘रन फॉर पीस’मध्ये धावले हजारो नाशिककर

रणजित पटेल, संजीवनी जाधव अर्धमॅरेथॉनचे विजेते

प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पोलीस आयुक्तालयातर्पेâ आयोजित ‘रन फॉर पिस’ नाशिक मॅरेथॉनमध्ये आज हजारो आबालवृद्ध नाशिककर धावले. एकवीस किलोमीटर गटात पुरुषांमध्ये रणजित पटेल, तर महिलांमध्ये संजीवनी जाधव विजेते ठरले.

पहाटे कडाक्याची थंडी असूनही हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान नाशिककरांच्या गर्दीने पुâलले होते. मॅरेथॉनच्या शुभारंभावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संग्राम सिंग, अप्पर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, अभिनेत्री सायली भगत उपस्थित होते.

ही मॅरेथॉन २१, १०, ५ व ३ किलोमीटर गटात घेण्यात आली. मॅरेथॉनमध्ये परदेशी धावपटूंनीही हजेरी लावली. उपायुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, अतुल झेंडे यांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्पूâर्त सहभाग घेतला. गतिमंद मुले, ज्येष्ठ नागरिकांचा स्पर्धेतील सहभाग वाखाणण्याजोगा होता. स्पोर्ट्स बाईक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या.

एकवीस किलोमीटर अर्धमॅरेथॉनच्या पुरुष गटात रणजित पटेल अव्वल ठरला. नीरजकुमार व गुरुमित सिंग यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. महिलांच्या गटात धावपटू संजीवनी जाधवने प्रथम, तर पूजा राठोड, मंजू सहाणी या अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. दहा किलोमीटर पुरुष गटात किसन तडवीने, मुलींमध्ये पूनम सोनवणेने; पाच किलोमीटर गटात पुरुषांमध्ये अश्विनीकुमारने, महिलांमध्ये सायली मेंगे यांनी विजय मिळविला. ज्येष्ठ नागरिकांच्या तीन किलोमीटर स्पर्धेत पुरुषांमध्ये बाळासाहेब पवार, महिलांमध्ये मनोरमा कुलकर्णी विजयी झाले.