रुपयाची ऐतिहासिक घसरण, महागाई वाढणार?

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एकीकडे मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीत ऐतिहासिक टप्पा गाठल्याचं चित्र असताना दुसरीकडे रुपयाची घसरण काही केल्या थांबत नाही असेच चित्र आहे. शुक्रवारी रुपया 70.96 प्रति डॉलर स्तरावर पोहोचला. रुपयात झालेली ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

शुक्रवारी सकाळी रुपया एका डॉलरच्या तुलने गुरुवारपेक्षा 17 पैशांनी खाली आल्याचे पाहायला मिळाले. या आठवड्यात रुपयाची ही घसरण झाल्याचे दिसते आहे. वर्षभराचा विचार केला तर या वर्षात एका डॉलरच्या तुलनेत रुपया 9.90 टक्क्यांनी खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि डॉलरची वाढलेली मागणी याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महागाई वाढणार?

रुपयाची घसरण सुरू राहिल्यास पेट्रोल-डिझेलच्या दरांवर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळेल. पेट्रोल-डिझेल महाग झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाला, वस्तूंच्या दरावर दिसेल.

summary: Indian Rupee now at 70.96 versus the US dollar