बारामतीच्या ऋषिकेशने गाठली १०१ स्पर्धांमध्ये ९१ बक्षिसांची उंची


सामना ऑनलाईन, संभाजीनगर

स. भु. करंडक राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत राज्यभरातील मोठमोठ्या स्पर्धा गाजविणाऱ्या अनेक वाक्पटूंना भेटण्याचा योग आला. मात्र, यामध्ये बारामतीच्या कृषी महाविद्यालयात बी.एस्सी अ‍ॅग्रीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या ऋषिकेश भारत पवार याने अवघे स्पर्धक आणि श्रोत्यांचे लक्ष वेधले. या साधारणत: १०० सेंटीमीटर उंची असलेल्या ऋषिकेशने आजवर १०१ स्पर्धांत भाग घेऊन तब्बल ९१ पारितोषिके पटकावली आहेत.

स. भु. करंडक राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेसाठी ‘म. गांधी यांचा विचार कालबाह्य झाला आहे’ हा विषय वादविवादासाठी ठेवण्यात आला होता. या विषयाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजूने अनेक विद्याथ्र्यांनी मत मांडले. मात्र कोड क्रमांक ४६ च्या स्पर्धकाची उद्घोषणा होताच सभागृहातून सर्वात कमी उंची असलेला ऋषिकेश व्यासपीठावर आला. माईकसमोर उभा राहिला आणि विषयाच्या अनुकूल बाजूने अत्यंत प्रभावी आणि मुद्देसूद मांडणी करीत त्याने तंतोतंत ७ मिनिटांपैकी पहिल्या पाच मिनिटांत आपले मुद्दे मांडले आणि उर्वरित दोन मिनिटांत प्रतिस्पध्र्यांच्या मुद्यांचे प्रभावी खंडणही केले. तो आला, बोलला आणि  सभागृह जिंकले.

त्याच्या या वक्तव्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर त्याच्याशी बोलताना त्याने आपल्या लहानपणापासूनच्या विविध स्पर्धांतील अनुभवांची थक्क करणारी यशोगाथा सांगितली. वडील जळगाव सुपे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहेत. भाऊ पुण्यात इंजिनिअिंरगच्या शेवटच्या वर्षात शिकतो आणि ऋषिकेश बारामती येथील  कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरमध्ये शिकतो.

ऋषिकेश दुसNया इयत्तेपासून प्रार्थनेच्या वेळी समोर उभा राहण्यापासून व्यासपीठावर असल्याचे सांगतो. तेव्हा काय बोलायचे, हे वडील लिहून देत होते. काहीच कळत नव्हते, पण मी धीटपणे सर्वांपुढे बोलत गेलो. पुढे विविध वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांत नगरच्या आघाडीच्या विद्याथ्र्यांना अनेकदा ऐकण्याचा योग आला. त्यातून स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली आणि वेगवेगळ्या विषयांवरील वाचन करणे सुरू केले. त्याच्या बळावर आजवर १०१ वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांत सहभागी झालो आणि आजचे हे ९१ वे बक्षीस मिळाल्याचे त्याने अभिमानाने सांगितले.

घरातील सर्व सदस्य नॉर्मल आहेत. मात्र, हार्मोन्सच्या गडबडीमुळे माझी उंची कमी असल्याचे डॉक्टर म्हणतात. मात्र, मी नाटक, पथनाट्य, लेखन आणि अशा स्पर्धांत सहभाग घेतो. माझ्या या छंदाला घरातील सर्वांचे मोठे पाठबळ मिळते. अशा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वाचनाचा मोठा फायदा होतो. त्या बळावरच पुढे संशोधन आणि स्पर्धा परीक्षा देण्याचा मानस त्याने व्यक्त केला. विद्याथ्र्यांनी आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयांतील पुस्तकांचे वाचन करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंद कराव्यात. या विद्याथ्र्यांच्या गुणांची माहिती मिळताच संस्थेचे सहकोषाध्यक्ष ज्ञानप्रकाश मोदाणी यांनी या विद्याथ्र्यास विशेष पुरस्काराने सन्मानित केले. स. भु. सारख्या अत्यंत शिस्तप्रिय संस्थेत मला खूप चांगला अनुभव आल्याचे ऋषिकेश याने सांगितले.