छोटीशी विजेती


लहानपणापासूनच गायक बनण्याचं स्वप्न असलेल्या अंजली गायकवाडने झी टीव्ही वाहिनीवरची प्रतिष्ठेची ‘सारेगामापा लिट्ल् चॅम्प’ स्पर्धा जिंकली. रविवारीच जयपूरमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात अंजलीला पश्चिम बंगालमधल्या क्षेयान भट्टाचार्य याच्याबरोबर विजयी घोषित करण्यात आलं. जिंकल्यानंतर अंजलीने आपले आणि आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. लहान मुलांमधील गायनकौशल्य शोधून त्यांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न आतापर्यंत अनेक मनोरंजन वाहिन्यांनी केलंय. यातूनच ‘सारेगमप’ हा संगीत रिअलिटी शो प्रसिद्ध झाला आहे.

संगीताशी संबंधित एखादा अविस्मरणीय क्षण विचारला तेव्हा अंजली म्हणाली, ‘सचिन तेंडुलकर’ चित्रपटातील मर्द मराठा या गाण्यानिमित्त मी पहिल्यांदाच ए. आर. रहेमान सरांना भेटली. त्यांनी जेक्हा माझे क्लासिकल गाणे ऐकले, तेक्हा त्यांनी माझे खूप कौतुकही केले आणि त्यांनी माझ्यासोबत सेल्फीही घेतली. हा अनुभक मी कधीच विसरू शकणार नाही, असे ती स्पष्ट करते. अहमदनगरला राहणाऱया अंजलीला आणि पश्चिम बंगालमधील मेदनीपूर येथील श्रेयान या दोघांनाही समसमान कोट्स मिळाल्याने दोघांनाही संयुक्तपणे किजयी घोषित करण्यात आले. या दोघांनाही पाच-पाच लाख रुपये बक्षिस देण्यात आले.

अंजलीच्या घरची पार्श्वभूमी संगीताचीच… तिचे वडील अंगद गायकवाड स्वतः संगीताचे प्रसिद्ध प्राध्यापक. बरीच वर्षे ते संगीताचे वर्गही चालवतात. त्यांच्याकडूनच अंजलीला संगीताचे बाळकडू मिळाले. यातूनच आपला आत्मविश्वास बळावल्याचे अंजली सांगते. वडिलांना आपले गुरू मानतानाच अंजली लतादिदी आणि आशादिदींची मोठी फॅन आहे. त्याबरोबरच कौशिकी चक्रवर्ती आणि मालिनी राजूरकर यांचं गायन आपल्याला आवडतं असं ती स्पष्ट करत

मेहनतीचे फळ मिळाले

स्पर्धा म्हटली म्हणजे ती जिंकायचीच असते या जिद्दीनेच अंजली नेहमी स्पर्धेत उतरते. त्यात संगीत हा तिचा जिव्हाळ्याचा विषय. मग त्यात ती मनापासून मेहनत घेते. ‘सारेगामापा लिट्ल् चॅम्प’ स्पर्धेसाठीही तिने खूप मेहनत घेतली. याबाबत ती सांगते, मी खूप मेहनत केली. लिट्ल् चॅम्प्समधील माझे म्युजिक कोच यांनी मला खूप मदत केली. मी माझे जजेस नेहा कक्कर, जाकेद अली आणि हिमेश रेशमिया यांची खूप आभारी आहे. कारण त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी वेगवेगळ्या शैलीची गाणी गाऊ शकले.