आजचा अग्रलेख : काळे पान! बाके बडवून सत्य मरेल काय?


पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी संसदेत देशभक्तीवर भाषण केले. राफेलचे समर्थन केले. दुसर्‍याच दिवशी राफेल प्रकरणातले ‘काळे पान’ समोर आले. बाके वाजवून देशभक्तीचे नारे देणार्‍यांची तोंडे त्यामुळे बंद झाली. राफेल प्रकरणातील मोदींच्या ‘सहभागा’चा एक नवा दस्तऐवज बाहेर पडला आहे. ‘हिंदू’ने संपूर्ण सत्य लोकांसमोर मांडलेले नाही, असे आता भाजपवाले म्हणत आहेत. पण यानिमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचे काय? उगाच विरोधकांना दोष का देता? ‘सत्यमेव जयते’ हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे. विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील!

बाके बडवून  सत्य मरेल काय?

जाहीर सभेत तावातावाने बोलावे व झोडपाझोडपी करावी अशाच थाटाचे भाषण आपले पंतप्रधान मोदी संसदेतही करतात. सत्ताधारी पक्षाचे लोक पंतप्रधानांच्या प्रत्येक वाक्यावर बाके बडवीत असतात. पण त्यामुळे संसदेच्या थोर परंपरेत काही भर पडत आहे काय? पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत काँग्रेसला ठोकून काढले. चांगलीच सालटी काढली. देशाचे हवाई दल बळकट होऊ नये यासाठीच राफेल करारावर सातत्याने टीका सुरू असल्याचा आरोप मोदी यांनी केला. काँग्रेसला लष्कराचे बळकटीकरण नको आहे असे नेहमीचेच आरोप पंतप्रधान करतात व दुसर्‍याच दिवशी राफेल करारात मोदी यांना व्यक्तिगत रस किती टोकाचा होता याबाबतचे कागदोपत्री पुरावे उघड होतात, यास काय म्हणायचे? राफेल करार हा हवाई दलाच्या बळकटीकरणासाठी झाला की एका गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी झाला? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांकडून अपेक्षित आहे. राफेलच्या व्यवहारात थेट आपले मोदीच ‘डील’ करीत होते. संरक्षणमंत्री, संरक्षण सचिव वगैरे प्रमुख मंडळीना या व्यवहारापासून लांब ठेवले गेले. राफेलच्या किमती ठरवण्यापासून ते हे कंत्राट कुणाला द्यायचे याबाबतचे सर्व निर्णय मोदी यांनीच घेतले आहेत. त्यामुळे आरोप व टीकेचे धनी त्यांना व्हावेच लागेल. ‘चौकीदार चोर है’ हा नारा राहुल गांधी यांनी दिला व तो देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला. यास काँग्रेस जबाबदार नाही तर राफेल प्रकरणातली आता उघड झालेली लपवाछपवी कारणीभूत आहे. श्री. मोदी म्हणतात, “तुम्ही मोदींवर टीका करा, भाजपवर टीका करा, पण देशावर टीका करू नका.’’ याचा अर्थ मोदीभक्तांनीच समजावून सांगावा.

संशयास्पद व्यवहार

जो राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे त्यावर खुलासा मागणे ही देशावर टीका कशी काय होऊ शकते? देशात लोकशाही आहे व तिचे खच्चीकरण कोण करीत आहे? लोकशाही व न्याय व्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे व हा अधिकार नाकारणे म्हणजे लोकशाहीचे खच्चीकरण. साडेचार वर्षांपासून देशावर मोदींचे एकछत्री राज्य आहे. तरीही महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत प्रत्येक गोष्टीचे खापर काँग्रेसवर फोडणे हे स्वतःचे अपयश झाकण्यासारखे आहे. सत्तर वर्षांत काँग्रेसने काय केले? या प्रश्नाच्या फेर्‍यातून मोदी व त्यांचे सरकार सत्तेचा कालावधी संपत आला तरी बाहेर पडलेले नाही. लोकांनी त्यांना सत्ता दिली, पण सत्ता ही फक्त विरोधकांच्या नाड्या आवळण्यासाठीच वापरली गेल्याने सत्ताधार्‍यांना पुनःपुन्हा काँग्रेसवर टीका करावी लागत आहे. काँग्रेसने देश कमजोर केला हा मोदींचा आरोप मान्य आहे. काँग्रेसवाले चोर, लफंगे, भामटे व डाकू आहेत. प्रत्येक काँग्रेसवाल्यास भरचौकांत फासावर उलटे लटकवायला हवे. काँग्रेस ही शिवी आहे हे सर्व मान्य केले तरी राहुल गांधी यांनी राफेल व्यवहाराबाबत विचारलेले प्रश्न कायम आहेत. पाचशे कोटींचे राफेल विमान सोळाशे कोटीस विकत घेण्यामागचा तर्क काय? व समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत देशाचा प्रत्येक नागरिक हा प्रश्न विचारीत राहील. राजकारणात तळे राखी तो पाणी चाखी हे मान्य, पण येथे समुद्रच गिळला जात आहे. सध्याच्या राजवटीत राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या व्याख्या बदलण्यात आल्या आहेत. राफेल कराराचे भजन गाईल तोच देशभक्त व राफेलच्या किमतीत वाढ करून कुणाचा फायदा केला, असे विचारणारे देशद्रोही. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी संसदेत

देशभक्तीवर भाषण

केले. राफेलचे समर्थन केले. दुसर्‍याच दिवशी राफेल प्रकरणातले ‘काळे पान’ समोर आले. बाके वाजवून देशभक्तीचे नारे देणार्‍यांची तोंडे त्यामुळे बंद झाली. काँग्रेससह त्यांचे संपूर्ण महागठबंधन म्हणजे महाभेसळ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्ही मोदींच्या भूमिकेशी सहमत आहोत. मात्र त्यांची ही टीका राफेलप्रकरणी त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर केल्या जात असलेल्या आरोपांचे उत्तर ठरत नाही. आता राफेल प्रकरणातील मोदींच्या ‘सहभागा’चा एक नवा दस्तऐवज बाहेर पडला आहे. ‘हिंदू’सारख्या प्रतिष्ठत दैनिकाने हा दस्तऐवज शुक्रवारी एका बातमीसह प्रसिद्ध केला आहे. राफेल व्यवहारात पंतप्रधान कार्यालयाकडून ‘समांतर वाटाघाटी’ सुरू होत्या आणि त्यावर संरक्षण विभागाने आक्षेप घेतला होता असे या बातमीत म्हटले असून त्याचा पुरावा म्हणून संरक्षण खात्याच्या अधिकार्‍याचे एक पत्रच त्यात प्रसिद्ध केले आहे. ही बातमी खोडसाळ आणि अर्धवट आहे, ‘हिंदू’ने संपूर्ण सत्य लोकांसमोर मांडलेले नाही, असे आता भाजपवाले म्हणत आहेत. (आम्हीही प्रार्थना करतो की ही ‘फेक न्यूज’ ठरो) पण यानिमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचे काय? देशाचे संरक्षण आणि ‘राफेल’संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या हल्ल्यानंतर चोवीस तासांत राहुल गांधी यांनी हा प्रतिहल्ला केला आहे. मोदी यांना पक्षात व बाहेर सच्चे मित्र राहिलेले नाहीत. व्यवहारात भावना नसते. राफेलमध्ये व्यवहार आहेच हे पुराव्यानिशी उघड झाले. उगाच विरोधकांना दोष का देता? ‘सत्यमेव जयते’ हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे. विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील!3 प्रतिक्रिया

 1. तुमच्याकडे काही पुरावे आहेत काय?
  रॉल गांधी संसदेत तोंडाला कुलूप लावून बसतो, शून्यात नजर लावून बसतो, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाही
  आणि बाहेर गेला की तोंड उघडतो (करण आई टिप्स देते)
  तो बोलतो, म्हणून मीडिया वाले एकजात उभे राहतात, जसे काही तेच न्यायाधीश आहेत

  जिथे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की आम्हाला काहीही गैर आढळले नाही तर मग रॉल अन मीडिया वाले पुरावा नसताना बोलत आहेत

  तुमच्याकडे आहेत पुरावे?
  असते तर एव्हाना तुम्ही पंतप्रधान पद मागितले असते
  तुमचे काम एकच, रोज मोदी च्या विरुद्ध बोलायचे

  त्याला करण एकच, तुम्हाला मुख्तामंत्रीपद मिळाले नाही, तुम्हाला सीट कमी असूनही मोक्याच्या पदे हवी होती, महाराष्ट्रात न दिल्लीत देखील
  तुम्हाला मोठे मोठे प्रोजेक्ट्स हवे होते, त्यातून पैसे मिळतो न तुम्ही मोकळे आहेतच – सत्तेचं आम्हाला अप्रुप नाही म्हणायला
  “कोणतीही जबाबदारी न घेता आम्हाला सत्ता हवी आहे उपभोगायला” ……

  2019 शिवसेना 10 पेक्षा कमी सीट्स वर असेल, मग जशी bmc मध्ये लाचारीने युती केली तशी भीक मागत, मोठ्या हिंदुत्वाच्या गोष्टी करत तुम्ही पण सत्तेत सामील व्हाल, आम्हाला माहीत आहे

  आमच्या बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती, आम्ही डोळे झाकून त्यांना मत द्यायचो, कारण बाळासाहेवनी असे मकडचले कधीही केले नाहीत.
  तुम्हाला कळेलच लवकर येत्या निवडणुकांमध्ये लोक तुमच्यावर किती नाराज आहेत ते
  थोडे जागे व्हा

 2. राफेल विमान खरेदी प्रकरणातील टर्म्स आणि कंडिशनस काय आहेत हे एकंदर कोणाला काहीच माहित नाही जनतेला आणि काँग्रेस ला पण ह्यातले काहीही ठाऊक नाही. परंतु जनतेच्या दृष्टिकोनात सरकारची प्रतिमा डागाळावी हाच एक उद्देश आरोपां मागे प्रकर्षाने जाणवतो.
  भाजप विरोधी कोणत्याही व्यक्तीला मग तो दलितजातीवादी असो कि अल्पसंख्यांक मुस्लिम असो तो सगळे आरोप खरे असल्याचे राहुल गांधी ला डोळे मिटून समर्थसन करणांर. आपण त्यानं लोकांची बौद्धिक क्षमता पहिले बघायला पाहिजे कारण बहुतांश हे दलित आणि मुस्लिम समर्थक कमी शिकलेले किंवा अशिक्षित असतात शिकले असतील तरी जेमतेम कुठेतरी फुकट शिक्षणाची किंमत नसली व्यक्ती असतात. त्यांना आपली जात आणि धर्म हा देशा पेक्षा श्रेष्ठ असतो. मग तो राहुल गांधी असो कि माया किंवा अखिलेश असो वा ओवैसी असो त्यांना हे सगळे परमपूज्य जसे मराठ्यांना शरदराव पूज्य. जाती साठी माती खाणारे व्यक्ती ला शिक्षणाची आणि तर्क वितर्काची जाण नसते तिथे फक्त अंधश्रद्धा काम करते.
  आता मुसलमानांचे बघा मोदी सरकार ला विरोध का विचारले तर ते म्हणतात जीएसटी आणि नोटबंदी हि प्रमुख करणे सांगतात पण ट्रिपल तलाक, गुजरात दंगे तसेच हिंदूवादी राष्ट्रीय सवयंसेवक संघाच्या विरुद्ध त्यांच्या मनात घृणा आहे हे लपवतात कारण ते व्यक्त करताना आपली हिंदू विरोधी असल्याची भावना उघड होईल त्या मुळे मोदी विरोध फक्त जीएसटी आणि नोटबंदी वर भागवतात.
  यात सत्य पण आहे कारण भारतात प्रत्येक शहरात मोमीनपुरा आणि इमामवाडा भागात मुस्लिमांची वस्ती आहे त्यामध्ये १००% व्यापारी हे मुस्लिमच असतात. इथे विक्रीला असलेला बहुतेक माल इतर शहरातील मुख्य बाजापेठेपेशा स्वस्त असतो अर्थात त्यात भेसळ आणि दर्जा ने पण कमी पण असतो. ह्यातलं बहुतेक जवळपास ७५% माल हा चोरबाजार, हायवे वर लुटले ट्रक आणि रेल्वे गोडाउन तसेच फोड कॉर्पोरेशन चे गोडाउन आणि रिफीनारीच्या बाजूला झोपडपट्टीतील मध्ये जाणाऱ्या येणाऱ्या ट्रक मधला चोरीचा पेट्रोल ऑइल अँड डिझल ची पण हिस्सेदारी असते. परंतु जीएसटी मुळे हे सगळे दोन नुंबर चे व्यापार करणे कठीण कठीण झाले आणि नोटबंदी मुळे ह्या असली समांतर अर्थव्यवस्थे तुन निर्माण केलेली काळ्या पैशाची विल्लेवाट लावणे पण तेवढेच कठीण झाले आहे.
  काँग्रेसला हे त्यामुळेच नको आहे कारण काँग्रेसचे राजकारण हे भ्रष्टाचार आणि वंशावळीचे राजकारण त्याला लागते दोन नंबरचा काळा पैसा पण तो आता नियंत्रणात आल्याने ह्या मुस्लिम समाजाची काँग्रेसची गोच झाली आहे. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे सोनिया आणि राहुल नॅशनल हेराल्ड मध्ये बेलवॉर बाहेर आहेत तर जावई एन्फोर्समेंट डायरेक्टर च्या कचाट्यात आहे. त्यामुळे हे सगळे उपद्रवमूल्य आपल्याला बघावयास मिळते…जनता शहाणी आहे आणि जनतेला सगळे ठाऊक आहे कोण किती सत्यवान आहे आणि कोण पापी आहे….

 3. सेने वाल्यांनो तुमचे दिवस संपले आहेत, अवतीभोवती हुजरे आणि मुजरे करणारे जमवून राजकीय पक्ष नाही चालवता येत। आपण काही छत्रपती नाही आणि रयतेसाठी आपण काय केले हे रयतेला माहित आहे। आहि तुमची लायकी जास्तीत जास्त ५० आमदार निवडून येण्याची होत टी पण मुदत संपली आहे।
  सेने वाल्यांनो तुमचे दिवस संपले आहेत, अवतीभोवती हुजरे आणि मुजरे करणारे जमवून राजकीय पक्ष नाही चालवता येत। आपण काही छत्रपती नाही आणि रयतेसाठी आपण काय केले हे रयतेला माहित आहे। आहि तुमची लायकी जास्तीत जास्त ५० आमदार निवडून येण्याची होत टी पण मुदत संपली आहे।
  मराठी माणूस तुमच्या पासून केव्हाच दूर गेला आहे हे लक्षात घ्या। सध्याचा काळ शिक्षित मुलांचा आणि जाणत्या रयतेचा आहे इथे खोटे ताव आणून बोलण्याने किंवा लोकांना अमिश दाखवून जमा करून भाषणे दिल्याने मतदान मिळत नाही। तुमची निष्ठा आणि कर्तृत्व लोकं बघतात गेल्या ४ वर्षात जे काही तुमचे रडगाणे जनतेने ऐकले ते तुम्हाला भारी पडणार आहे।