SAAMANA EFECT: निवडणूक आयोगाला मिळाला पेन

1

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

‘मतदान जनजागृतीची पाटी कोरी, स्वाक्षरी करण्यासाठी मार्करच नाही’ ही बातमी दै. ‘सामना’च्या बुधवार दि. 24 च्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी खडबडून जागे झाले आणि बुधवारी पहाटेच या स्वाक्षरी फलकावर सही करण्यासाठी मार्कर पेन उपलब्ध करून दिला. यावेळी या स्वाक्षरी फलकावर सही करण्यासाठी नागरीकांची झुंबड उडाली होती.

उरण तहसिल कार्यालयाच्या बाहेर पोलीस स्टेशनच्या इमारतीला मतदान जनजागृती करण्यासाठी बॅनर लावला होता. या बॅनरवर मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी सह्या करायच्या होत्या. मात्र या बॅनरवर सही करण्यासाठी पेन नसल्याने आठवडाभर हा बॅनर कोराच होता. या विषयी दै. ‘सामना’मध्ये बातमी आणि छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने या बॅनरसाठी पेन उपलब्ध करून सह्यांचा शुभारंभ करण्यात आला.