‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा

trupti-desai-bhumata-brigade

सामना ऑनलाईन । मुंबई

शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळ सरकारकडे सुरक्षा मागूनही प्रतिसाद न आल्याने भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई संतापल्या आहेत. तसेच जर मंदिर प्रवेशावेळी काही गडबड गोंधळ झाला, तर त्याला केरळ सरकार जबाबदार असेल, असा जबर इशाराही त्यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून 17 नोव्हेंबरला मी केरळला जाणार असून सरकारकडे सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच काही गोंधळ उडाल्यास त्याची जबाबदारी सरकार आणि पोलीस महासंचालकांची असेल, असंही त्या म्हणाल्या आहेत.

महिलांना मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे अशी मागणी करणाऱ्या तृप्ती देसाई यांनी आता त्यांचा मोर्चा शबरीमला मंदिराकडे वळवला आहे. 17 नोव्हेंबरला त्या शबरीमला इथे जाणार असून या दौऱ्यासाठी केरळ सरकारकडे त्यांनी सुरक्षाकडं पुरवण्याची मागणी केली होती.