सचिनशी ‘चार्मिंग गर्ल’चा रोमान्स!

सामना ऑनलाईन । हैदराबाद

‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हा हैदराबादमध्ये आला असता एका ‘चार्मिंग गर्ल’ने त्याच्यासोबत रोमान्स केला, असा आरोप फेसबुकवर करून वादग्रस्त तेलगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने खळबळ उडवून दिली आहे.  तिने आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केलेली ‘चार्मिंग गर्ल’ म्हणजे तेलुगू अभिनेत्री चार्मी कौर असल्याचे मानले जात आहे. महान व्यक्ती चांगला खेळ खेळू शकतात याचा अर्थ माझ्या दृष्टीने चांगला रोमान्स करू शकतात असा आहे, असेही विधान श्री रेड्डीने केले आहे. तिच्या या वादग्रस्त पोस्टवर सचिन तेंडुलकर किंवा अभिनेत्री चार्मी कौर हे काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अभिनेत्री श्री रेड्डी हिने अलीकडेच कास्टिंग काऊचच्या विरोधात हैदराबादमधील तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या समोर भरस्त्यावर स्वतः टॉपलेस होऊन चित्रपटसृष्टीला धक्का दिला होता. तिने अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांवर कास्टिंग काऊचचे आरोप याआधी केलेले आहेत.