मास्टर शेफ… सचिन बनला कूक, मित्रांसाठी बनवलं जेवण

सामना ऑनलाईन । मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची खवय्येगिरी त्याच्या सगळ्या चाहत्यांना माहित आहे. खाण्यासोबतच सचिनला जेवण बनवायला देखील आवडते. त्याच्या या आवडीतूनच त्याने मुंबईत काही रेस्टॉरंट देखील सुरू केली आहेत. नुकतंच सचिनने त्याच्या घरात आयोजित केलेल्या पार्टीत त्याच्या मित्रांसाठी स्वत:च्या हाताने जेवण बनवलं आहे. सचिनने स्वत: चिकन रोस्ट करतानाचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओसोबत त्याने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. “नवीन वर्षाच्या पार्टीत मित्रांसाठी जेवण बनवणं खरंच आनंददायी आहे. मला खूप आनंद होतोय की त्यांना माझ्या हातचे जेवण आवडलं आणि ते सर्वजण हाताची बोटं चाटत आहेत. माझ्या सर्व चाहत्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना २०१८ हे वर्ष आनंदाचे जावे” असे त्याने पोस्ट केले आहे.