#ICCWorldCup सचिनच्या नावावरील वर्ल्डकपमधील ‘हे’ 4 विक्रम मोडणे अशक्य

80

सामना ऑनलाईन । मुंबई

क्रिकेटचा देव, विक्रमांचा बादशाह, हिंदुस्थानचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर क्रिकेटमधील शेकडो विक्रम आहेत. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये 6 वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सचिनच्या नावावरील काही विक्रम आवाक्यातील आहेत, तर काही अचाट. या अचाट विक्रमांना मोडणे आगामी काळात एकाही फलंदाजाला जमणार नाही.

सर्वाधिक डावात फलंदाजी –
सचिनने 6 वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करताना 44 डावात फलंदाजी केली. सचिन खालोखाल ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार आणि फलंदाज रिकी पॉंटिंगचा नंबर लागतो. पॉंटिंगने वर्ल्डकपमध्ये 42 डावात फलंदाजी केली. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटरमध्ये ख्रिस गेल या यादीत असून त्याने 26 डाव खेळले आहेत. गेलचा हा शेवटचा वर्ल्डकप असेल. त्यामुळे भविष्यात सचिनचा हा विक्रम मोडणे अशक्य आहे.

सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विक्रम –
वर्ल्डकप मध्ये 200 पेक्षा जास्त चौकार ठोकण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने 45 लढतीत 44 डावात फलंदाजी करताना 241 चौकार लगावले आहे. दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या रिकी पॉंटिंगने 96 चौकार लगावले आहे. सध्या वर्ल्डकपमध्ये खेळत असणाऱ्या एकही खेळाडूच्या नावावर 90 पेक्षा जास्त चौकार नाहीत.

सर्वाधिक धावा करणारा खेळाडू –
सचिन तेंडुलकरने सहा वर्ल्डकपमध्ये 44 डावांमध्ये फलंदाजी करताना 56.95 च्या सरासरीने दणदणीत 2278 धावा चोपल्या आहेत. यात 6 शतकी आणि 15 अर्धशतकीय खेळींचा समावेश आहे. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सचिनचा हा विक्रम मोडणे अशक्य वाटत आहे. कारण यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडचा मार्टीन गप्टिल फक्त सचिनच्या मार्गावर परंतु कोसो दूर आहे. गप्टिलच्या नावावर दोन वर्ल्डकपमध्ये मिळून 809 धावा जमा आहेत.

सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा –
सचिनने वर्ल्डकपमध्ये 6 शतके आणि 15 अर्धशतके लगावली आहेत. याचाच अर्थ त्याने 21 वेळ 50 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर 12 वेळा 50 पेक्षा जास्त धावा काढण्याचा विक्रम आहे. सध्या खेळत असणारा एकही खेळाडू 6 पेक्षा जास्त अर्धशतकी किंवा शतकी खेळी करू शकलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या