INDvPAK पाकिस्तानला आयते गुण का द्यायचे? खेळा व दारूण पराभव करा – सचिन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळायचा की नाही यावरून सध्या चर्चा सुरू असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधातील सामना रद्द करू नये असे मत मांडले आहे. पाकिस्तानविरोधातील सामना न खेळून त्यांना दोन गुण देण्यापेक्षा पाकिस्तानचा दारुण पराभव करा’ असे सचिनने सांगितले आहे.

‘आतापर्यंतच्या इतिहासात हिंदुस्थानने पाकिस्तानला विश्वचषकात कायम हरवले आहे. आता पुन्हा त्यांना हरविण्याची वेळ आली आहे. सामना न खेळता पाकिस्तानला दोन गुण देणे हे चुकीचे वाटते. त्यामुळे त्यांनी विश्वचषकात मदतच होईल. माझ्यासाठी कायम माझा देश सर्वात पहिला येतो. त्यामुळे माझा देश जो निर्णय घेईल त्याला माझा पाठिंबा असेल’, असे सचिन तेंडुलकर याने सांगितले.