महिलेसोबत संबंध असल्याच्या अफवा, साधूबाबाने स्वत:चे लिंग छाटले

1
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । बांदा

उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. बांदा जिल्ह्यातील एका साधूबाबाचे महिलेसोबत संबंध असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांमुळे बेजार झालेल्या साधूबाबाने स्वत:चे लिंग छाटले आहे. गावकऱ्यांची याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत साधूबाबाला रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदानी बाबा (वय, 45) बांदा जिल्ह्यातील एका सरकारी जमिनीवर झोपडी बनवून राहात होता. गुरुवारी तो ज्या गावाशेजारील मैदानात राहत होता त्या गावातील नागरिकांनी साधूबाबाचे एका महिलेसोबत संबंध असल्याची आव उठवली. या अफवेमुळे साधूबाबाला लोकांनी नावं ठेवण्यास सुरुवात केली. या खोट्या आरोपांमुळे उद्विग्न झालेल्या साधूबाबाने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी ब्लेडच्या सहाय्याने स्वत:चे लिंग छाटले. गावकऱ्यांना हा प्रकार समजला तेव्हा त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना साधूबाबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. पोलिसांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. येथील डॉक्टरांनी गंभीर जखमी साधाबाबांवर प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

साधूबाबाचे लिंग जवळपास 80 टक्के शरिरापासून वेगळे झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांनी प्रकृति गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात साधूबाबाने गावातील दोन व्यक्तींविरोधात मानसीक त्रास दिल्याचा आरोप लगावला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहे.