ट्रायल रूममध्ये सावध राहा

ट्रायल रूममध्ये कपडे बदलताना घ्यावयाची काळजी – 

– आरशावर बोट ठेवा. जर आरसा आणि बोटाच्या मध्ये अंतर दिसल्यास आरसा नेहमीप्रमाणे आहे. अंतर न दिसल्यास तो टू-वे मिरर आहे, असे समजावे.

– लाइट बंद करून स्मार्टफोनच्या फ्लॅशलाइटने आरसा जवळून न्याहाळा. टू-वे मिरर असल्यास तुम्ही दुसऱ्या बाजूलाही पाहू शकाल.

– भिंतीवरील आरसाही दोन्ही बाजूंनी दिसू शकेल असा असतो. या आरशाच्या काचेला मायक्रो पेन या पदार्थाचा मुलामा दिलेला असतो. त्यामुळे समोरून जे दृश्य दिसते अगदी त्यासारखेच दृश्य या आरशाच्या मागील बाजूनेही दिसते.

– खूप जवळ जाऊन आरशात पाहा. जर तुमच्या चेहऱ्यात थोडा जरी फरक दिसला तर हा टू-वे मिरर असू शकतो.

– अशा प्रकारचा आरसा असल्यास चेंजिंग रूममधला दिवा खूपच प्रकाशमान असतो. कारण पलीकडच्या बाजूने व्यवस्थित पाहाता यावे. अशा वेळी खोलीतील दिवा मंद करून आरशात बघू शकता.

– चेहरा आरशाजवळ नेऊन दोन्ही हातांनी डोळ्यांवर येणारा उजेड थांबवा. अशावेळी आरशातून पलीकडे बघणे सोपे जाईल.