साहेब चषक माहीममध्ये

प्रातिनिधीक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । मुंबई  

मुंबई ग्रेटर बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या सहकार्याने श्री समर्थ सेवा मंडळाकडून येत्या 12 जानेवारीला ‘साहेब चषक’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माहीम येथील लोकमान्य विद्यामंदिर शाळेमागील मैदान, र. म. गवंडे उद्यान, भंडार गल्ली येथे ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत 60, 65, 70, 75, 80, 85 आणि 85 किलोवरील वजनी गटांत खेळाडू सर्वस्व पणाला लावतील. या स्पर्धेत मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड येथील नामवंत खेळाडूंचा सहभाग असणार आहे. तसेच दोन लाख रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव यावेळी करण्यात येणार आहे. ही स्पर्धा जिंकणार्‍यास रोख रुपये 25 हजार व साहेब चषक प्रदान करण्यात येईल.