मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली

1

सामना ऑनलाईन । कौलालंपूर

हिंदुस्थानची ‘शटलक्वीन’ सायना नेहवाल हिचा मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील झंझावाती खेळ शनिवारी थांबला. स्पेनची दिग्गज खेळाडू कॅरोलिना मरीन हिने सायना नेहवालला 21-16, 21-13 अशा फरकाने हरवत फायनलमध्ये प्रवेश केला.

सायना नेहवालने 2017 साली या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. तसेच 2011 साली तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या लढतीतही तिची सुरुवात चांगली झाली. पण स्पेनच्या कॅरोलिना मरीनने दोन्ही गेममध्ये जबरदस्त खेळ करीत विजयाला गवसणी घातली. चौथ्या सीडेड कॅरोलिना मरीनने 40 मिनिटांमध्ये विजय मिळवला. दरम्यान, याआधी सायना नेहवालने जपानच्या नोझोमी ओकुहरा हिला हरवत उपांत्य फेरीत धडक मारली होती.