राजीव गांधी हत्येतील दोषींच्या मुक्ततेसाठी तामीळनाडू सरकार वचनबद्ध

8

सामना ऑनलाईन। सालेम

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील सातही दोषींच्या मुक्ततेसाठी आपले सरकार वचनबद्ध आहे, असा खुलासा तामीळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सोमवारी केला. ते म्हणाले की, विधानसभेच्या शिफारशींनुसार या दोषींना सोडून देण्यासाठी राज्यपाल निर्णय घेतील. व्यक्तिशः आम्हालाही त्या सातहीजणांना मुक्त करावे असे वाटते. त्यासाठीच आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडला असून तो राज्यपालांकडे पाठवला आहे, असेही पलानीस्वामी यांनी स्पष्ट केले.

मुक्ततेसाठी राज्यपाल निर्णय घेणार असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले तेव्हाच विरोधी पक्षांनी या सातजणांच्या मुक्ततेसाठी पुन्हा याचिका दाखल करायला सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यासोबत मारल्या गेलेल्यांचे कुटुंबीय या याचिकेविरोधात आहेत. त्यांनी या सातजणांच्या मुक्ततेला विरोध केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या