महेश मांजरेकरांच्या चित्रपटाला सलमानच्या शुभेच्छा

सामना ऑनलाईन, मुंबई

महेश मांजरेकर यांचा नवीन चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘ध्यानीमनी’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाला सलमान खानने शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर ट्विट करत सलमानने या शुभेच्छा दिल्या आहेत.

बऱ्याच दिवसांनी अश्विनी भावे चित्रपटात पुन्हा बघायला मिळणार आहे.महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे यांच्याशिवाय मृण्मयी देशपांडे हिची देखील चित्रपटात महत्वाची भूमिका आहे.