‘बिग बॉस’ साठी सलमानला किती पैसे मिळतात माहिती आहे?

सामना ऑनलाईन, मुंबई

बिगबॉसचा ११ वा सीझन १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या रिअॅलिटी शो साठी सलमान खानला किती पैसे मिळत असावेत याचा अंदाज बांधण्याची स्पर्धा सध्या सुरु झाली आहे, कारण सलमान खान हा बॉलीवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सलमान खानने या शोसाठी ११ कोटी रुपये घेतल्याचं सांगितलं जात आहे.

कलर्स वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राज नायक यांना या ‘शो’ च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सलमानने खरोखर ११ कोटी रूपये घेतले आहे का याबाबत विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही. ‘सलमान खान इतका स्वस्त नाहीये’ असं म्हणत त्यांनी एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर दिलं.