‘दस का दम’ साठी सलमानने आकारले इतके मानधन

सामना ऑनलाईन । मुंबई

‘दस का दम’ या रिअॅलिटी शो द्वारे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान सज्ज झाला आहे. ‘दस का दम’ या रिअॅलिटी शोचा हा तिसरा पर्व असून त्यासाठी त्याने ७८ कोटी इतके मानधन घेतले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दस का दम’ हा रिअॅलिटी शोमध्ये सलमान पुन्हा एकदा सुत्रसंचालकाच्या भूमिकेत असेल. या शोमध्ये एकूण २६ भाग असणार असून त्यातील प्रत्येक भागासाठी ३ कोटी रूपये इतके मानधन तो घेणार आहे. यानंतर तो ‘बिग बॉस १२’ आणि राम कपूर यांच्या एक कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’सारखाच हा एक क्विज शो असून याची संकल्पना मात्र थोडीशी वेगळी आहे. सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या या रिअॅलिटी शोच्या प्रोमोचे सध्या शूटिंग सुरू असून या प्रोमोमध्ये तो लोकांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हा शो बिग बींच्या ‘कौन बनेगा करोडपती’इतकाच प्रसिद्ध होणार का हे आता पाहावे लागेल.