….तर शाहरुखचा ‘मन्नत’ सलमानचा झाला असता!

152

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची जीवनशैली सुखासीन आहे. तो महागडे कपडे घालतो, महागड्या गाडीतून फिरतो. त्यातही सर्वात जास्त चर्चा असते ती ‘मन्नत’ ची. मुंबईच्या समुद्रकिनारी असलेल्या शाहरुखच्या या बंगल्याची किंमत 200 कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र, शाहरुखच्या आधी हा बंगला सुपरस्टार सलमान खानने विकत घेतला असता. त्याची हा बंगला विकत घेण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने तयारीही केली होती. मात्र, एका कारणाने त्याने तो विकत घेतला नाही आणि नंतर शाहरुखने हा बंगला विकत घेतला. हा बंगला आपण का विकत घेतला नाही, याचे कारण सलमानने एका मुलाखतीत सांगितले.

ssalman-saharukh

शाहरुख खानच्या आधी हा बंगला आपण विकत घेतला असता. त्यासाठी आपली सर्व तयारीही झाली होती. मात्र, आपले वडील सलीम खान यांनी आपल्याला एक प्रश्न विचारला, एवढा मोठा बंगला विकत घेऊन काय करणार, वडिलांच्या या प्रश्नावर आपण गांभीर्याने विचार केला आणि तो बंगला विकत घेण्याचा विचार मनातून काढून टाकला असे सलमानने सांगितले. आता मी शाहरुखला हाच प्रश्न विचारू इच्छितो की तो एवढ्या मोठ्या घरात काय करतो अशी कोपरखळीही सलमानने मारली.

आपण दिल्लीतून आलो आहोत. दिल्लीतील लोकांच्या मनात कोठीत राहण्याचे स्वप्न असते. मुंबईत मोठ्या किंवा अलीशान अपार्टमेंट राहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. दिल्ल्लीत सर्वसामान्य व्यक्तीही आयुष्याची पुंजी खर्च करून कोठीत राहण्याचे स्वप्न बघतो. आपलेही असेच स्वप्न होते असे शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले. आपण मुंबईत आलो तेव्हा पत्नी गौरीसोबत एका अपार्टमेंटमध्ये राहत होतो. माझी सासू नेहमी मला म्हणायची एवढ्या लहान घरात का राहता, एखादे चांगले घर शोधा. त्यानंतर मी जेव्हा ‘मन्नत’ बंगला पाहिला, तेव्हा माझ्या मनातील दिल्लीच्या कोठीची इच्छा पुन्हा जागी झाली आणि हा बंगला विकत घेण्याचा आपण निर्णय घेतला. आतापर्यंतची आपली ही सर्वात मोठी आणि महागडी पॅशन असल्याचे शाहरुखने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या