सलमानने रेल्वे स्टेशनवर काढली रात्र

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता सलमान खानकडे जगातील एकाहून एक महागड्या गाड्या आहेत. त्यामुळे शूटिंग व्यतिरिक्त कधी रेल्वेस्थानकावर जायची वेळ कधी त्याच्यावर आली नाही. मात्र सलमानला त्याच्या एका चुकीमुळे चक्क रेल्वेस्थानकावर त्याला रात्र काढावी लागल्याचे समोर आले आहे. सलमानने एका मुलाखतीत तो रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपल्याचे सांगितले आहे.

कॉलेजमध्ये असताना सलमान रेल्वेने घरी जायचा. एका दिवशी सलमान मित्राला भेटून घरी परतत असताना त्याची शेवटची लोकल चुकली. त्यामुळे त्याला पहिल्या लोकलची वाट पाहत स्टेशनवरच थांबावे लागले. स्टेशनवरच्या बाकड्यावर बसून त्याने काही वेळ झोप काढली व नंतर घरी जाण्यासाठी पहिली लोकल पकडली. खिडकीजवळ बसून प्रवास करताना थंड हवेमुळे सलमानचे डोळे पुन्हा मिटू लागले व काही वेळातच तो गाढ झोपी गेला. त्यानंतर जेव्हा त्याला जाग आली तो थेट विरारला पोहोचला होता. तोपर्यंत व्यवस्थित उजाडलही होतं. विरारवरून वांद्र्याला घरी पोहचेपर्यंत कॉलेजमध्ये लेक्चरची वेळ होणार होती. त्यामुळे तो पुन्हा त्याच लोकलमध्ये बसून चर्चगेटला गेला. तिथून कॉलेजला जाऊन दिवसभर सगळे लेक्चर बसला. त्यानंतर दुपारी तो घरी गेला.