‘टायगर जिंदा है’ मध्ये सलमान,कॅटरीना दहशतवाद्यांशी लढणार ?

सामना ऑनलाईन, मुंबई

‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचं नवं पोस्टर अभिनेता सलमान खान याने ट्विट करत प्रेक्षकांसमोर आणलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान खानच्या हातामध्ये अॅटोमॅटीक रायफल दिसतेय तर कॅटरीना कैफच्या हातामध्ये एक रिव्हॉल्व्हर दिसतेय.

पोस्टरवरून या चित्रपटामध्ये हे दोघेजण दहशतवाद्यांशी मुकाबला करणार असल्याचं स्पष्टपणे जाणवायला लागलं आहे. या चित्रपटाच्या कथानकामध्ये हे दोघेजण हिंदुस्थानमध्ये दहशतवादी कारवाया घडवण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेला टक्कर देतात असं कथानक असल्याचं सांगण्यात येत आहे. २२ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या पोस्टरमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढायला लागली आहे.