‘या’ अभिनेत्याने धर्मेंद्रना दिलं सरप्राईज


सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची शुक्रवारी त्यांच्या फार्महाऊसवर जाऊन भेट घेतली. सलमानच्या या सरप्राईज भेटीमुळे धर्मेंद्र खूपच खूश झाले. त्यांनी त्यांचा हा आनंद सोशल मीडियावर भेटीचा एक फोटो शेअर करत व्यक्त केला आहे.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सलमानसोबतच्या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे. धर्मेंद्र यांनी ट्वीट करत ‘आमच्या फार्महाऊसवर तू दिलेल्या सरप्राईज भेटीमुळे मला खूपच आनंद झाला आहे. तू मला माझ्या मुलाप्रमाणेच आहेस’ अशा शब्दांत त्यांनी सलमानसाठीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. धर्मेंद्र यांनी याआधी सलमानसोबत ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

धर्मेंद्र यांचा हा फोटो बॉबी देओलनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सलमानसोबत ‘रेस ३’ मध्ये बॉबी देओल काम करत आहे. या चित्रपटात अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि डेझी शाह हे कलाकारही असणार आहेत.