Video- ‘ढिंच्याक पूजा’चं  ‘ते’ गाणं सलमाननं गायलं

सामना ऑनलाईन । मुंबई
बिग बॉसचा ११वा सिझन सुरुवातीपासूनच विविध वादांमुळे गाजत आहे. रोज नवनवे वाद बिग बॉसच्या घरात होत आहेत. आता या वादग्रस्त घरात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. ढिंच्याक पूजाने वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. मात्र घरात जाण्यापूर्वी सलमान आणि ढिंच्याक पूजा यांच्यातील गप्पा चांगल्याचं रंगल्या.

सलमनाने ‘सेल्फी मैने लेली आज’ हे गाणं बोलत तिचं स्वागत केलं. मात्र बोलता बोलता हे गाणं हिट कसं काय झालं? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच प्रेक्षकांनी हे गाणं हिट कसं केलं? असाची सवाल मस्करीत सलमानने विचारला. दोन वर्षापूर्वी ढिंच्याक पूजाने युट्युबवर गाणी करण्यास सुरुवात केली. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांकडूनही चागंली पसंती मिळाली आहे. ढिंच्याक पूजाची ‘स्वॅगवाली टोपी..’, ‘दिलो का शुटर..’ ही गाणीही चांगलीच गाजली. ‘ढिंच्यॅक पूजा’चं नवं गाणं आलं आहे. या गाण्याला दोन दिवसांमध्ये दोन लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे.