पाकिस्तानात गेलेल्या पहिलवानावर सलमान बनवतोय सिरियल

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता सलमान खान आता एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण, यावेळी तो निर्मात्याच्या भूमिकेत असून गामा पहिलवान यांच्या आयुष्यावरच्या मालिकेची निर्मिती करणार आहे. सलमानचा भाऊ अभिनेता सोहेल खान या मालिकेत गामा पहिलवानाच्य भूमिकेत झळकणार आहे.

gama-pahalwan

विशेष म्हणजे, या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षयही एका खास भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका ५२ भागांची असून याचं प्रक्षेपण स्टार प्लस वाहिनीवर दर शनिवार आणि रविवारी होणार आहे.

कोण होते गामा पहिलवान?
गामा पहिलवान यांचं खरं नाव होतं गुलाम मोहम्मद बक्ष. वयाच्या दहाव्या वर्षापासून कुस्तीला सुरुवात करणारे गामा पहिलवान हे एक अद्वितीय कुस्तीपटू मानले जातात. आयुष्यातली एकही कुस्ती न हरलेला पहिलवान असा त्यांचा लौकिक होता. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते पाकिस्तानमध्ये गेले. १९६०मध्ये वयाच्या ८२व्या वर्षी त्यांचं निधन झालं.