कंडोमच्या जाहिरातीवर ‘बिग बॉस’ सलमान भडकला


सामना ऑनलाईन । मुंबई

सलमान खान बिग बॉसच्या घरात कुठलीही चुकीची गोष्ट खपवून घेत नाही. चुकीच्या वागणाऱ्या स्पर्धकांना तो विकेंड का वारमध्ये चांगलेच फटकारतो. मात्र यावेळेस सलमानच्या रागाचा सामना स्पर्धकांना नाही तर बिग बॉसच्या निर्मात्यांना करावा लागला आहे. सलमान बिग बॉसच्या घरात लावलेल्या कंडोमच्या जाहिरातीमुळे संतापला असून त्याने तत्काळ या जाहिराती हटविण्यास सांगितल्या आहेत.

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांचे छायाचित्र असलेल्या कंडोमच्या जाहिराती बिग बॉसच्या घरात लावलेल्या होत्या. “बिग बॉस हा कार्यक्रम संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघते. त्यामुळे माझ्या या शोमध्ये मला अशा अश्लिल जाहिराती नको.” असे सलमानने निर्मात्यांना सांगितले. सलमानची नाराजी कोण पत्करणार म्हणून निर्मात्यांनी पण त्या जाहिराती तत्काळ हटविल्या.

बिग बॉसमध्ये सध्या पुनीश शर्मा आणि बंदगी कारलाची प्रेमकहाणी रंगतेय. हे दोघेही आसपासच्या कॅमेरांचा विसर पडल्यासारखे एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांचे इंटिमेट सीन टेलिकास्ट झाल्यानंतर त्या आठवड्याच्या विकेंड का वारमध्ये सलमानने त्या दोघांनाही फटकारले व त्यांना हा कार्यक्रम कौंटुबिक कार्यक्रम असल्याची आठवण करून दिली होती.