‘गोठ’च्या सेटवर आशा काळे यांच्या अभिनयाला सलाम!

2

सामना प्रतिनिधी, मुंबई

जुन्या काळातल्या मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे हे भारदस्त नाव. सोज्वळ, कष्टाळू स्त्रीच्या, गृहिणीच्या अनेक भूमिका आशाताईंनी अजरामर केल्या. त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. स्टार प्रवाहच्या ’गोठ’ या मालिकेच्या सेटवर आशाताईंची आठवण आली. एक सीन शूट करताना अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी आशाताईंच्या अभिनयाला सलाम केला. सुप्रिया म्हणतात, ’तुळशीला हात जोडण्याचा सीन केला ’गोठ’मध्ये. आशाताई काळेंची आठवण आली. अशा प्रसंगात पूर्ण कन्व्हिक्शनने काम करण्यात त्या सर्वोत्तम. त्यांच्या टाइपचं काम करायला वेगळीच मजा. तसं जमेलच असं नाही. पण एक प्रामाणिक प्रयत्न… त्यांना सलाम!’