संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या मैदानात, प्रदेशाध्यक्ष आखरेंची घोषणा

13

सामना प्रतिनिधी । नगर

संभाजी ब्रिगेड येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व जागा लढविणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिली आहे. येत्या विधानसभेत जिल्ह्यात सर्व उमेदवार देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. नगर येथील जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

यंदाची विधानसभा ही संभाजी ब्रिगेडचे पहिली निवडणूक असून या निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी संभाजी ब्रिगेडने केली आहे. सध्या राज्यभर दौरा सुरु असून राज्यभर दौरा करुन उमेदवारांची निश्चिती करण्यात येणार आहे. नवयुवकांना उमेदवारी देऊन सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहुन निवडणुकीत सर्वांना संधी देऊन संभाजी ब्रिगेडची सत्ता आणण्यासाठी काम सुरु असल्याची माहिती प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या