जेवढा मोठा विजय तेवढी मोठी जबाबदारी – पालकमंत्री निलंगेकर

80

सामना प्रतिनिधी, लातूर

लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत फिर एक बार मोदी सरकार निवडून दिले आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना भरभरून मते देत विजयी केले आहे. या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. विजय जेवढा मोठा आहे तेवढीच जबाबदारीही मोठी असून ती पार पाडण्यासाठी काम करू, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.

मतदारसंघातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. भाजपावर प्रेम करणाऱ्या मतदारांनी आपल्या मताचे दान सुधाकर शृंगारे यांच्या पदरात टाकले. शृंगारे यांच्या विजयासाठी मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी प्रचंड मेहनत घेतली. शृंगारे यांचा विजय हे या परिश्रमाचे फळ आहे. या निवडणुकीत विजय मिळाल्याने आता आम्हाला अधिक जोमाने कामाला लागावे लागणार आहे. मोदी यांच्या नेतृत्वात ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणाने आम्ही काम करत आहोत. यापुढेही याच पद्धतीने काम करू. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, गोरगरीब कष्टकऱ्यांच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत यासाठी आम्ही काम करत राहू असे सांगून जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या