सॅमसंगच्या सर्वात महागडय़ा फोनच्या स्क्रीन तुटल्याच्या तक्रारी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सॅमसंगचा सर्वात महागडा फोन गॅलेक्सी फोल्ड या मोबाईलमध्ये अनेक त्रुटी असून एक-दोन वेळा वापरातच या फोनची फोल्डेबल स्क्रिन तुटत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत 1980 डॉलर म्हणजेच सुमारे 1 लाख 40 हजार रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड हा फोन वापरणाऱ्यांपैकी काहीजणांच्या फोनची स्क्रिन तुटली तर काहींनी स्क्रिनवरील स्क्रॅचगार्ड काढल्यावर फोनच्या स्क्रिनचे खूप नुकसान झाले, तर काही फोनची स्क्रिन ब्लँक दिसत आहे. अमेरिकेत येत्या 26 एप्रिलपासून या फोनचा सेल सुरू होणार आहे. सॅमसंगने वर्षाच्या सुरुवातीलाच जगातील पहिला फोल्डेबल फोन लॉन्च केला.

प्रोटेक्टिव्ह लेअर हटवल्यानेच अडचणी

फोल्डेबल फोनच्या डिस्प्लेविषयीच्या तक्रारी आल्याचे सॅमसंगने मान्य केले आहे. डिस्प्लेमध्ये नेमकी काय समस्या आहे याचा शोध घेण्यात येणार असून स्क्रिनवरील प्रोटेक्टिव्ह लेअर हटवल्यानेच अडचणी निर्माण होत अंदाज सॅमसंगने व्यक्त केला आहे.