सॅमसंगच्या सर्वात महागड्या फोनमध्ये गडबड

3

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

सॅमसंगचा सर्वात महागडा फोन गॅलेक्सी फोल्ड या मोबाईलमध्ये अनेक त्रुटी असून एक-दोन वेळा वापरातच या फोनची फोल्डेबल क्रिन तुटत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत 1980 डॉलर म्हणजेच सुमारे 1 लाख 40 हजार रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड हा फोन वापरणाऱयांपैकी काहीजणांच्या फोनची क्रिन तुटली तर काहींनी क्रिनवरील क्रॅचगार्ड काढल्यावर फोनच्या क्रिनचे खूप नुकसान झाले, तर काही फोनची क्रिन ब्लँक दिसत आहे. अमेरिकेत येत्या 26 एप्रिलपासून या फोनचा सेल सुरू होणार आहे. सॅमसंगने वर्षाच्या सुरुवातीलाच जगातील पहिला फोल्डेबल फोन लॉन्च केला.

प्रोटेक्टिव्ह लेअर हटवल्यानेच अडचणी
फोल्डेबल फोनच्या डिस्प्लेविषयीच्या तक्रारी आल्याचे सॅमसंगने मान्य केले आहे. डिस्प्लेमध्ये नेमकी काय समस्या आहे याचा शोध घेण्यात येणार असून क्रिनवरील प्रोटेक्टिव्ह लेअर हटवल्यानेच अडचणी निर्माण होत अंदाज सॅमसंगने व्यक्त केला आहे.